Thief : बोकड विकत घेण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील दागिने चोरणारा जेरबंद 

Thief : बोकड विकत घेण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील दागिने चोरणारा जेरबंद 

0
Thief : बोकड विकत घेण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील दागिने चोरणारा जेरबंद 
Thief : बोकड विकत घेण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील दागिने चोरणारा जेरबंद 

Thief : नगर : श्रीगोंदा तालुक्यातील स्टेशन रस्त्यावरील दळवी वस्तीवर बोकड विकत घेण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून (Gold jewelry theft) नेणारा संशयित आरोपी (Suspected Accused) स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने जेरबंद केला आहे.

अवश्य वाचा: उपमुख्यमंत्रीपदानंतर आता सुनेत्रा पवार यांच्यावर ‘ही’ महत्त्वाची जबाबदारी

सापळा रचून आरोपीस घेतले ताब्यात

जाक्या बगदास काळे (वय ४२,रा. चोराचीवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने हा गुन्हा त्याचा साथीदार ओंकार शक्ती काळे (रा. साळन देवी रोड, रडेवाडी, ता. श्रीगोंदा), यांनी मिळून केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंदा तालुक्यात महिलेच्या गळ्यातील दागिने चोरणारा जाक्या काळे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले.

नक्की वाचा: अहिल्यानगरमध्ये ५ ते ९ फेब्रुवारीदरम्यान ‘कृषीपर्व’ जिल्हा कृषी महोत्सव

आरोपी विरुध्द विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल (Thief)

संशयित आरोपी काळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुध्द विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार गणेश लोंढे, गणेश लबडे, फुरकान शेख, शामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, मनोज साखरे यांच्या पथकाने केली.