Chain snatching : नगर : शिर्डी (Shirdi) येथे देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणारा (Chain snatching) रेकॉर्डवरील सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केला आहे. त्याच्याकडून दोन लाख ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अवश्य वाचा: उपमुख्यमंत्रीपदानंतर आता सुनेत्रा पवार यांच्यावर ‘ही’ महत्त्वाची जबाबदारी
दोन लाख ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत
विकास गोडाजी चव्हाण (वय -४०, रा. रेल्वे गेटजवळ, अशोकनगर, श्रीरामपूर), असे ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने हा गुन्हा त्याचा साथीदार गणेश विजय चव्हाण (रा. श्रीरामपूर),राखी गणेश चव्हाण (रा. श्रीरामपूर ते अशोकनगर जाणारे रोड, मोहटादेवी मंदीराजवळ), केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यांच्याकडून चोरी केलेला दोन लाख ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नक्की वाचा: अहिल्यानगरमध्ये ५ ते ९ फेब्रुवारीदरम्यान ‘कृषीपर्व’ जिल्हा कृषी महोत्सव
संशयित आरोपी हा सराईत गुन्हेगार (Chain snatching)
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार शिर्डी येथे आलेल्या भाविकांची लूट करणारा संशयित विकास चव्हाण असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलीस तपासात आले असून त्याच्या विरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे, पोलीस अंमलदार राहुल द्वारके, रोहित येमुल, सुनील मालणकर, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे यांच्या पथकाने केली.



