Deportation : नगर : भिंगार कॅम्प पोलीस ठाणे (Bhingar Camp Police Station) हद्दीत सातत्याने गुन्हेगारी कृत्यांमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगार टोळीविरोधात पोलिसांनी कडक कारवाई करत चार सराईत गुन्हेगारांना (Hardened criminal) एक वर्षासाठी हद्दपार (Deportation) केले आहे. पोलिसांनी त्यातील तिघांना ताब्यात घेऊन अहिल्यानगर जिल्ह्याच्या हद्दीबाहेर सोडले आहे. तर एक जण पसार असून त्याचा शोध सुरू आहे.
नक्की वाचा: चेन स्नॅचिंग करणारा रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
पोलीस अधीक्षकांकडे हद्दपारीचा प्रस्ताव सादर
भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी गुंड व सराईत गुन्हेगारांचा अभिलेख तपासून महाराष्ट्र पोलीस कायदा कलमान्वये हद्दपार प्रस्ताव पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे सादर केला होता. त्या प्रस्तावास मंजुरी देत अधीक्षक घार्गे यांनी हद्दपार आदेश पारित केले आहेत. यामध्ये नाजीश उर्फ नन्या साजीद सय्यद (रा. वाबळे कॉलनी, मुकुंदनगर), असद इरफान सय्यद (रा. हमीद पार्क, मरीयम मस्जिदजवळ, मुकुंदनगर), अफनान उर्फ अप्पु आदिल शेख (रा. रचना हौसिंग, वाबळे कॉलनी, मुकुंदनगर) व दानिश उर्फ धन्या फारूख शेख (रा. जुनी घासगल्ली, तांबटकर गल्ली, तेलीखुंट) यांचा समावेश आहे. आदेशानुसार नाजीश सय्यद, असद सय्यद व अफनान शेख यांना मंगळवारी तत्काळ ताब्यात घेऊन अहिल्यानगर जिल्ह्याच्या सरहद्दीबाहेर सोडण्यात आले आहे. तर दानिश शेख हा पसार आहे. त्याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
अवश्य वाचा: वाळूतस्करीवर तत्काळ कारवाई करा; आमदार आशुतोष काळेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
सहाय्यक पोलीस निरीक्षक मुलगीर यांच्या नेतृत्वाखाली कारवाई (Deportation)
ही कारवाई अधीक्षक घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मुलगीर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार रवींद्र पांडे, राम माळी यांच्यासह भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे अंमलदार अहमद इनामदार, इसराईल पठाण, रवी टकले, प्रमोद लहारे, रेखा पुंड आणि किरण बर्वे यांनी सहभाग घेतला.



