Book Festival : प्रवरा लोणीत होणार राज्यातील सर्वात मोठा ‘ग्रंथोत्सव’

Book Festival : प्रवरा लोणीत होणार राज्यातील सर्वात मोठा 'ग्रंथोत्सव'

0
Book Festival : प्रवरा लोणीत होणार राज्यातील सर्वात मोठा 'ग्रंथोत्सव'
Book Festival : प्रवरा लोणीत होणार राज्यातील सर्वात मोठा 'ग्रंथोत्सव'

Book Festival : नगर : जागतिक मराठी दिनाचे (World Marathi Day) औचित्य साधत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व सिंधुताई एकनाथराव विखे पाटील सार्वजनिक वाचनालयातर्फे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीला अहिल्यानगर जिल्हा ‘ग्रंथोत्सव’ (Book Festival) होणार आहे. हा ग्रंथोत्सव महाराष्ट्रातील सर्वात मोठा ग्रंथोत्सव करण्याचे नियोजन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व सिंधुताई एकनाथराव विखे पाटील सार्वजनिक वाचनालयातर्फे (Sindhutai Eknathrao Vikhe Patil Public Library) सुरू करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवात राज्यातील मान्यवर साहित्यिक व पुस्तक प्रकाशन संस्थांसह पत्रकार, वाचक मोठ्या संख्येत सहभागी होणार आहेत.

Book Festival : प्रवरा लोणीत होणार राज्यातील सर्वात मोठा 'ग्रंथोत्सव'
Book Festival : प्रवरा लोणीत होणार राज्यातील सर्वात मोठा ‘ग्रंथोत्सव’

अवश्य वाचा: गोपीचंद पडळकर यांचं नवीन गाणं प्रदर्शित; समर्थकांनी केला कौतुकाचा वर्षाव

जिल्हा ग्रंथोत्सवाच्या नियोजनाची बैठक

अहिल्यानगर जिल्हा ग्रंथोत्सवाच्या नियोजनाची बैठक आज (ता. ५) जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात नाशिकचे सहायक ग्रंथालय संचालक सचिन जोपुळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी रामदास शिंदे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जिल्हा प्रमुख जयंत येलुलकर, प्रकाशक संघटनेचे प्रतिनिधी प्रा. गणेश भगत, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सुरेंद्र शिंदे, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, मराठी भाषा समिती अहिल्यानगरचे किशोर मरकड, सिंधुताई एकनाथराव विखे पाटील सार्वजनिक वाचनालय लोणी बुद्रुकच्या सचिव मिरा काकडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे शैलेश घेंगडमल, संतोष कापसे आदी उपस्थित होते.

Book Festival : प्रवरा लोणीत होणार राज्यातील सर्वात मोठा 'ग्रंथोत्सव'
Book Festival : प्रवरा लोणीत होणार राज्यातील सर्वात मोठा ‘ग्रंथोत्सव’

हे देखील वाचा: 32 तास अन् बघ्यांचा कोडगेपणा; राज ठाकरेंच्या प्रत्येक शब्दांत ‘वार’

मोठे पुस्तक प्रदर्शनही भरणार (Book Festival)

या बैठकीत २७ व २८ फेब्रुवारीला प्रवरा लोणी येथे हा कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवले असल्याचे सांगण्यात आले. या कार्यक्रमातील उद्घाटकांची नावे, ग्रंथदिंडी, विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. यावेळी मोठे पुस्तक प्रदर्शनही भरणार आहे. या पुस्तक प्रदर्शनात राज्यातील सर्व नामांकित पुस्तक प्रकाशन संस्था सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमातील विविध चर्चा सत्रांतून वैचारिक मेजवानीही रसिकांना मिळणार आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्वात मोठा ग्रंथोत्सव करण्याचा मानसही यावेळी उपस्थितांनी व्यक्त करत त्यादृष्टीने नियोजन केले. या कार्यक्रमाच्या विविध सत्रांत जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.