Ahilyanagar | नगर : महावितरणाकडून महत्वाच्या कामांसाठी शनिवारी (ता. ७) शटडाउन घेण्यात येणार आहे. त्यामुळे अहिल्यानगर (Ahilyanagar) शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगर भागाचा ७ ते १० फेब्रुवारी या कालावधीत एक दिवस विलंबाने पाणी पुरवठा होईल.
हेही वाचा – प्रवरा लोणीत होणार राज्यातील सर्वात मोठा ‘ग्रंथोत्सव’
ट्री कटिंग तसेच बाकीचे देखभाल व दुरूस्तीचे काम (Ahilyanagar)
महावितरण कंपनीला ट्री कटिंग तसेच बाकीचे देखभाल व दुरूस्तीचे काम करण्यासाठी ३३ के. व्ही मुळा डॅम विद्युत वाहिनी शनिवारी (ता. ७) सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत शटडाउन घेण्यात येणार आहे. या शटडाउन वेळेत अहिल्यानगर महापालिकेच्या शहर पाणी पुरवठा योजनेवरील महत्वाची दुरूस्तीची कामे शनिवारी (ता. ७) सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. दरम्यान काळात मुळानगर, विळद येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाही. त्यामुळे शनिवारी (ता. ७) पाणी पुरवठा होणाऱ्या बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्ता, पाईपलाईन रस्ता, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर तसेच सारसनगर, बुरूडगाव रोड, केडगाव, नगर-कल्याण रस्त्यावरील शिवाजीनगर परिसर आदी भागाला रविवारी (ता. ८) पाणी पुरवठा करण्यात येईल.
अवश्य वाचा – शिर्डीत भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या : अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर
रविवारी (ता. ८) पाणी पुरवठा होवू घातलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागाला म्हणजेच मंगलगेट, रामचंद्र खुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रस्ता, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हडको, प्रेमदान हडको, टी.व्ही. सेंटर परिसर, म्युनिसीपल हडको, स्टेशन रस्ता, आगरकर मळा, विनायक नगर आदी भागाला पाणी पुरवठा करण्यात येणार नाही, या भागातील पाणीपुरवठा हा रविवार ऐवजी सोमवारी (ता. ९) करण्यात येईल.
महापालिका प्रशासनाचे आवाहन (Ahilyanagar)
सोमवारी (ता. ९) रोटेशनानुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागाला म्हणजेच सिध्दार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रस्ता, आनंदीबाजार, कापड बाजार, ख्रिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने महापालिका कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रस्ता परिसर व सावेडी आदी भागाला महापालिकेतर्फे पाणी पुरवठा करण्यात येणार नाही. या भागातील पाणीपुरवठा सोमवार ऐवजी मंगळवारी (ता. १०) करण्यात येईल. तरी नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.



