Maharashtra Sahitya Parishad : नगर : महाराष्ट्रातील मराठी भाषेची पालक संस्था असलेल्या 120 वर्षांची समृद्ध परंपरा असलेल्या पुणे (pune) येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जिल्हा प्रमुख पदाच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत येथील महाराष्ट्र साहित्य परिषद, सावेडी उपनगर शाखेचे प्रमुख कार्यवाह व रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर (Jayant Yelulkar) व गणराज प्रकाशन चे प्रा. गणेश भगत (Prof. Ganesh Bhagat) यांची जिल्हाप्रमुख पदी बिनविरोध निवड झाली आहे. म.सा.प (Maharashtra Sahitya Parishad) ही महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या समृद्धी साठी काम करणारी साहित्य क्षेत्रातील अतिशय प्रतिष्ठित पालक संस्था असून राज्यात परिषदेचे कार्य गौरवपूर्ण सुरू असून येलुलकर हे यापूर्वीही परिषदेवर निवडून आले आहेत. त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाची दखल घेत महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा वि.ल कुलकर्णी स्मरणार्थ उत्कृष्ट कार्यकर्ता या राज्य स्तरीय पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे.
नक्की वाचा: अजितदादांच्या आठवणींनी संगमनेर भावूक; शोकसभेत सर्वपक्षीय नेते एकवटले
येलुलकर यांच्या निवडीने साहित्य क्षेत्रात आनंद
श्री नरेंद्र फिरोदिया अध्यक्ष असलेल्या मसाप च्या सावेडी उपनगर शाखेच्या माध्यमातून त्यांनी मराठी भाषेची चळवळ जोमाने उभी करीत फिरोदिया यांच्या नैतृत्वाखाली राज्यस्तरीय विभागीय साहित्य संमेलन, बाल साहित्य संमेलन, राज्यस्तरीय युवा साहित्य नाट्य संमेलनाचे यशस्वी आयोजन करीत अहिल्यानगरचा साहित्य क्षेत्रात ठसा उमटवला आहे.जिल्ह्यातील साहित्यिकांसाठी विविध उपक्रम राबवताना त्यांच्यातील प्रतिभेला व्यासपीठ देण्याचे गौरवास्पद कार्य केले आहे मसाप सावेडी उपनगर शाखा व शांती कुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन यांच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून प्रकाशित होत असलेल्या वारसा दिवाळी अंकाचे ते संपादक असून अंकांस गेल्या पाच वर्षांपासून राज्यस्तरीय पारितोषिकाने गौरविले जाते. त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांनी त्यांची दोनदा परिषदेचे विभागीय कार्यवाह म्हणून एकमताने नियुक्ती केली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी करण्यात आलेल्या यशस्वी प्रयत्नांत देखील त्यांचे योगदान मोलाचे असून येलुलकर यांच्या निवडीने साहित्य क्षेत्रात आनंद व्यक्त केला जात आहे.
अवश्य वाचा: भंडारदरा शताब्दी महोत्सवाचा सर्वंकष आराखडा तयार करा: विखे पाटील
प्रा.गणेश भगत यांची परिषदेवर प्रथमच निवड (Maharashtra Sahitya Parishad)
प्रा.गणेश भगत यांची परिषदेवर प्रथमच निवड होत असून त्यांच्या गणराज प्रकाशनाच्या माध्यमातून त्यांनी दोनशे दोन पुस्तके प्रकाशित केले असून त्यांची स्वतःची वीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत.साहित्य क्षेत्रात तळमळीने काम करणारा कार्यकर्ता, लेखक, प्रकाशक, उत्कृष्ट निवेदक अशी त्यांची ओळख असून प्रा.गणेश भगत हे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तसेच छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार समितीचे कार्यकारी समन्वयक आहेत.
श्री. येलुलकर व प्रा.भगत यांच्या निवडीबद्दल त्यांचे ज्येष्ठ साहित्यिक खा यशवंतराव गडाख,आ.संग्राम भैय्या जगताप, उद्योजक व मसाप च्या सावेडी उपनगर शाखेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, प्राचार्य डॉ अनिल सहस्रबुद्धे, विलास गिते,ज्येष्ठ कवी श्री चंद्रकांत पालवे, मेधाताई काळे तसेच नगर जिल्ह्यातील साहित्य, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व संस्था, संघटनांनी त्यांचे अभिनंदन केले आहे



