Corona : कोरोना योद्ध्यांनाही सेवेत सामावून घ्या..अन्यथा आंदोलनाचा इशारा

Corona : कोरोना योद्ध्यांनाही सेवेत सामावून घ्या..अन्यथा आंदोलनाचा इशारा

0
Corona : कोरोना योद्ध्यांनाही सेवेत सामावून घ्या..अन्यथा आंदोलनाचा इशारा
Corona : कोरोना योद्ध्यांनाही सेवेत सामावून घ्या..अन्यथा आंदोलनाचा इशारा

Corona : नगर : कोरोना (Corona) काळात कोरोना योद्धा (Corona Warrior) म्हणून कंत्राटी पद्धतीवर नोकरी करणाऱ्यांंना कायमस्वरुपी सेवेत सामावून घ्या, अन्यथा बेमुदत आमरण उपोषण (Indefinite hunger strike until death) करणार असल्याचा इशारा कोरोना योद्धा पदावर काम करणाऱ्या सनी माघाडे यांनी अहिल्यानगर महापालिका प्रशासनाला (AMC) दिला आहे. माघाडे यांनी याआधीही अनेकदा महापालिकेला निवेदन दिले असून त्यावर अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्याने आज पुन्हा एकदा माघाडे यांनी महापालिकेला निवेदनाद्वारे मागणी केलीयं. निवेदनाची दखल घेत मागणी पूर्ण न झाल्यास बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा माघाडे यांनी दिला आहे.

नक्की वाचा: अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित ४३७ विहिरींसाठी ६३ लाखांचा निधी मंजूर

10 वर्षांची अट शिथिल करुन नियुक्ती करावी…

आरोग्यसेवकांची राज्य सरकारकडून 10 वर्ष पूर्ण झालेल्या आरोग्यसेवकांना सेवेत सामावून घेण्याबाबत निर्णय झाला आहे. या निर्णयामधील 10 वर्षांची अट शिथिल करुन कोरोना योद्ध्यांनाही सेवेत सामिल करुन घ्यावे, अशी मागणी सनी माघाडे यांनी केली आहे.

हे देखील वाचा: दु:खदायक बातमी! यवतमाळ जिल्ह्यात 31 दिवसांत 22 शेतकरी आत्महत्या

कोरोना योद्ध्यांना रोजगार उपलब्ध नसल्याने उपासमारीची वेळ (Corona)

कोरोना काळात महापालिकेच्यावतीने अनेक उमेदवारांची कोरोना योद्धा म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, सात महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर कोरोना योद्ध्यांना सेवेतून कमी करण्यात आले. सध्या या कोरोना योद्ध्यांना कुठेही रोजगार उपलब्ध नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळी आलीयं. या पार्श्वभूमीवर सनी माघाडे यांनी आज महापालिकेच्या आयुक्तांकडे सेवेत सामावून घेण्याची मागणी निवदेनाद्वारे केलीयं.

अनेकदा निवेदन देऊनही महापालिका प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने मागाडे यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या पोर्टलवरही तक्रार दाखल केलीयं. त्यामुळे आता प्रशासनाची निवेदनाची योग्य दखल घेतली नाही तर दि. 9 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाला असल्याचा इशारा सनी माघाडे यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.