Funeral : अंत्यविधीसाठी लाकडांऐवजी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर; जिवदया गोशाळेचा अनोखा उपक्रम

Funeral : अंत्यविधीसाठी लाकडांऐवजी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर; जिवदया गोशाळेचा अनोखा उपक्रम

0
Funeral : अंत्यविधीसाठी लाकडांऐवजी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर; जिवदया गोशाळेचा अनोखा उपक्रम
Funeral : अंत्यविधीसाठी लाकडांऐवजी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर; जिवदया गोशाळेचा अनोखा उपक्रम

Funeral : संगमनेर: हिंदू संस्कृतीमध्ये (Hindu Culture) अंत्यविधीसाठी मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर केला जातो. मात्र वाढती जंगलतोड आणि पर्यावरणाचे होणारे नुकसान (Environmental Damage) लक्षात घेता अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात जिवदया गोशाळेने एक अनोखा आणि पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेतला असून, अंत्यविधीसाठी (Funeral) लाकडाऐवजी गाईच्या शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमामुळे निसर्गाची हानी टळणार असून प्रदूषणातही मोठ्या प्रमाणात घट होणार आहे.

नक्की वाचा: अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित ४३७ विहिरींसाठी ६३ लाखांचा निधी मंजूर

संकल्पनेला समाजातून चांगला प्रतिसाद

विशेष म्हणजे हिंदू धर्मात गाईला आणि तिच्या गोवऱ्यांना धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व असल्याने या संकल्पनेला समाजातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक तालुक्यांतून या उपक्रमाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया येत असून, पर्यावरण संवर्धन आणि परंपरा यांचा सुंदर समन्वय साधणारा हा उपक्रम ठरत आहे.

Funeral : अंत्यविधीसाठी लाकडांऐवजी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर; जिवदया गोशाळेचा अनोखा उपक्रम
Funeral : अंत्यविधीसाठी लाकडांऐवजी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर; जिवदया गोशाळेचा अनोखा उपक्रम

हे देखील वाचा: दु:खदायक बातमी! यवतमाळ जिल्ह्यात 31 दिवसांत 22 शेतकरी आत्महत्या

लाकडाला पर्याय म्हणून गोवऱ्यांचा वापर (Funeral)

आतापर्यंत शेणाचा वापर खातासाठीच व्हायचा परंतु आता आम्ही त्यापासून गोवऱ्या तयार करतो. अंत्यविधीसाठी लाकडांचा वापर होत असतो, मात्र त्याला पर्याय म्हणून गोवऱ्या वापरल्या तर अंत्यविधी चांगला आणि विधिपूर्वक होईल. गोवऱ्यांमुळे चार तासात दहन होऊन राख सावडण्याचा कार्यक्रम लगेच होऊ शकतो. त्यामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही, वृक्षतोड ही होणार नाही, अशी माहिती जिवदया गोशाळेचे संचालक राजेश दोषी यांनी दिली.