Rouble Nagi:काश्मिरी कन्येला मिळाला शिक्षण क्षेत्रातील ‘नोबेल’;रुबल नागी नेमक्या कोण?

0
Rouble Nagi:काश्मिरी कन्येला मिळाला शिक्षण क्षेत्रातील 'नोबेल';रुबल नागी नेमक्या कोण?
Rouble Nagi:काश्मिरी कन्येला मिळाला शिक्षण क्षेत्रातील 'नोबेल';रुबल नागी नेमक्या कोण?

नगर: समाजासाठी मनापासून काहीतरी करण्याची ओढ असेल ना तर नशिबाचे दरवाजे कसे उघडतात,याच उत्तम उदाहरण सेट केलं आहे,भारतीय शिक्षिका रुबल नागी (Rouble Nagi) यांनी. भारतीय शिक्षिका आणि प्रसिद्ध कलाकार रूबल नागी यांनी दुबईत आयोजित ‘वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट’ (World Government Summit) मध्ये मानाचा ‘ग्लोबल टीचर प्राइज २०२६’ (Global Teacher Prize 2026′)जिंकून जगभरात भारताची मान उंचावली आहे. या पुरस्कारासोबतच त्यांना १ मिलियन डॉलर (९ कोटी रुपयांहून अधिक रुपयांचे) बक्षीस देण्यात आलं आहे. मात्र रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या रुबल नागी या नेमक्या कोण आहेत, हेच आपण जाणून घेऊ…

नक्की वाचा: लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव देणार?;देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? 

दुबईचे क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांच्या हस्ते रुबल नागी यांना या ग्लोबल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. विशेष बाब म्हणजे रुबल नागी यांची निवड ही १३९ देशांतील ५००० शिक्षकांमधून करण्यात आली. नागी या हा पुरस्कार जिंकणाऱ्या १० व्या शिक्षिका आहेत. दुबईत आयोजित ‘जागतिक सरकार शिखर परिषदे’च्या व्यासपीठावर जेव्हा एका भारतीय महिलेचे नाव गुंजले, तेव्हा संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने भरून गेले होत. पुरस्कार स्वीकारताना रुबल नागी यांना आपले अश्रू अनावर झाले. मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमध्ये फिरत मुलांना शिक्षण देणाऱ्या एका शिक्षिकेचं काम थेट जागतिक पातळीवर पोहोचणं ही देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

अवश्य वाचा: ‘दो दीवाने सहर में’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित;सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकूर हळवी प्रेमकहाणी

कोण आहेत रुबल नागी? (Rouble Nagi)

रूबल नागी यांचा जन्म ८ जुलै १९८० रोजी जम्मू-काश्मीरमध्ये झाला. त्या एक कुशल शिल्पकार, आर्ट इन्स्टॉलेशन एक्सपर्ट आणि चित्रकार आहेत. रूबल यांनी आपल्या कलेचा वापर समाजसेवेचे  माध्यम म्हणून केला. २०१७ मध्ये राष्ट्रपती भवन संग्रहालयात प्रदर्शनासाठी आमंत्रित केल्या जाणाऱ्या त्या पहिल्या कलाकार ठरल्या होत्या. रूबल नागी यांनी शिक्षणाची ओढ असलेल्या मुलांसाठी २४ वर्षांपूर्वी एका लहान खोलीत फक्त ३० मुलांपासून शिक्षण देण्यास सुरुवात केली होती.आज त्यांची ‘रूबल नागी आर्ट फाउंडेशन’ ही संस्था संपूर्ण भारतात ८०० हून अधिक शैक्षणिक केंद्र यशस्वीपणे चालवत आहे. या केंद्रांच्या माध्यमातून अशा मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवलं जातं, ज्यांना कधीही शाळेत जाण्याची संधी मिळाली नाही.

अवश्य वाचा: ‘दो दीवाने सहर में’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित;सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकूर हळवी प्रेमकहाणी  
झोपडपट्ट्या, दुर्गम भाग, दुर्लक्षित वस्ती, जिथे शाळा पोहोचणं अवघड आहे,तिथे रुबल नागी यांनी शिक्षण पोहचवलं. झोपडपट्ट्यांमधील भिंतींना ‘शैक्षणिक भित्ती चित्रांमध्ये’ बदलल्याबद्दल रूबल नागी यांचा जागतिक स्तरावर गौरव करण्यात आला आहे. त्या भिंतींवर अशी चित्रं काढतात,ज्यातून मुलं साक्षरता आणि गणित शिकतात. ही चित्रं केवळ अभ्यासापुरती मर्यादित नसून सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण जागृतीबद्दलही मुलांना शिक्षित करतात. २०२२ मध्ये रूबल नागी यांचे ‘द स्लम क्वीन’ हे पुस्तक प्रकाशित झालं, ज्यामध्ये त्यांनी आपले अनुभव मांडले आहेत. विज्ञान आणि इतिहासासारखे कठीण विषय त्या कलेच्या माध्यमातून सोपे करून भिंतींवर मांडतात. शिक्षण केवळ चार भिंतींच्या आतच नाही, तर मोकळ्या आकाशाखालील शिक्षण दिलं जाऊ शकतं हे त्यांनी सिद्ध केलं आहे.

रुबल नागी यांनी ‘मिसाल इंडिया’ आणि ‘मिसाल मुंबई’सारखे उपक्रम राबवून शिक्षणासोबत स्वच्छता, पिण्याचं पाणी, जीवनकौशल्य आणि व्यावसायिक प्रशिक्षण यावरही भर दिला.’ग्लोबल टीचर प्राइज’ हे ‘वर्की फाउंडेशन’तर्फे दिलं जातं, ज्याचे संस्थापक सनी वर्की आहेत.२०२६ हे या पुरस्काराचं १० वं वर्ष होतं. जगभरातील अशा शिक्षकांना हा अत्यंत महत्त्वाचा सन्मान दिला जातो, ज्यांनी आपल्या उत्कृष्ट अध्यापन पद्धतीतून समाजात क्रांतिकारी बदल घडवून आणला आहे. २०२६ च्या मानकरी मात्र भारताच्या रुबल नागी ठरल्या आहेत.

लहान मुलांसाठी नवीन शाळा आणि लर्निंग सेंटर्स उघडण्याचा मानस (Rouble Nagi)

 रूबल नागी या त्यांना मिळालेल्या ८.३ कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेचा वापर भारतातील लहान मुलांसाठी नवीन शाळा आणि लर्निंग सेंटर्स उघडण्यासाठी करणार आहेत. मुख्य प्रवाहातील शिक्षण पद्धतीपासून दूर असलेल्या मुलांपर्यंत ‘स्ट्रक्चर्ड लर्निंग’ पोहोचवणं हे त्यांचं ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मुंबईच्या गल्ल्यांमध्ये सुरू झालेला रूबल यांचा शिक्षणाचा प्रवास हा जागतिक व्यासपीठावर पोहोचला आहे. ही केवळ एका शिक्षिकेची यशोगाथा नाही, तर तळागाळातील शिक्षणाला मिळालेली आंतरराष्ट्रीय दाद आहे.