India Vs USA | अमेरिकेवर भारताचा दणदणीत विजय; टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा

0

India Vs USA | नगर : टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल (ता. ७) मुंबईतील वानखेडे क्रिकेट मैदानावर भारत विरुद्ध अमेरिका (India Vs USA) असा सामना रंगला. या सामन्यात भारताने (India) अमेरिका (USA) संघाचा २९ धावांनी पराभव करत स्पर्धेची विजयी सुरुवात केली.

हेही वाचा – मोदी संघाचे पण, त्यांचा पक्ष संघापासून वेगळा; डॉ. मोहन भागवत यांची भूमिका

नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय (India Vs USA)

अमेरिकेच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अमेरिकन गोलंदाजांच्या माऱ्यासमोर भारतीय फलंदाज क्रमाक्रमाने बाद होत राहिले. दुसऱ्याच षटकात भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा खातेही न उघडता बाद झाला. इशान किशन व तिलक वर्मा यांनी संघाच्या धावफलकाला आकार देण्याचा प्रयत्न केला मात्र, प्रथम इशान किशन (१६ चेंडूत २० धावा) व नंतर तिलक वर्मा (१६ चेंडूत २५ धावा) हे लागोपाठ बाद झाले. शुभम दुबेही खाते न उघडताच तंबूत परतला. रिंकू शर्मा ६ तर हार्दिक पंड्या अवघ्या ५ धावा करत बाद झाला. एका बाजूने फलंदाज झटपट बाद होत असतानाच मात्र, दुसऱ्या बाजू कर्णधार सूर्यकुमार यादवने पदाला साजेशी कामगिरी करत ४९ चेंडूत नाबाद ८४ धावा केल्या. त्याला अक्षर पटेलने (१४ धावा) साथ देण्याचा प्रयत्न केला. सूर्यकुमारच्या खेळीच्या जोरावर भारताने २० षटकांत ९ गडा गमावत १६१ धावा जमविल्या. अमेरिकेकडून शॅडली व्हॅन शाल्कविकने चार षटकांत २५ धावा देत सर्वाधिक चार फलंदाज बाद केले तर हरमित सिंगने दोन फलंदाज बाद केले.

अवश्य वाचा – अवैध धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे छापासत्र; एमआयडीसी पोलीस ठाण्यात १४ गुन्हे दाखल

भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा (India Vs USA)

१६२ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या अमेरिकेच्या फलंदाजांची भारतीय गोलंदाजांसमोर त्रेधा उडाली. अमेरिकेचे पहिले तीन फलंदाज बाद झाले त्यावेळी त्यांच्या धावफलकावर होत्या अवघ्या १३ धावा. त्यानंतर मिलिंद कुमारने ३४, संजय कृष्णमूर्तीने ३७ तर शुभम रांजणेने ३७ धावा करत संघाला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. अखेर भारतीय गोलंदाजांनी अमेरिकेच्या संघाला २० षटकांत आठ गडी गमावत १३२ धावाच करू दिल्या. भारताकडून मोहम्मद सिराजने तीन, अक्षर पटेल व अर्षदीप सिंगने प्रत्येकी दोन तर वरुण चक्रवर्तीने एक फलंदाज बाद केला.

आज तीन सामने (India Vs USA)

टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज (ता. ८) अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, इंग्लंड विरुद्ध नेपाळ व श्रीलंका विरुद्ध आयरलंड, असे सामने होणार आहेत. हे सर्व सामने एक तर्फी होण्याची चिन्हे आहेत. काल (ता. ७) झालेल्या इतर सामन्यांत पाकिस्तानने नेदरलंडला तीन गडी राखून तर वेस्ट इंडिजने स्कॉटलंडला ३५ धावांनी पराभूत केले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here