Crime News : जुन्या वादातून चाकूने जीवघेणा हल्ला; चौघांविरूध्द गुन्हा दाखल

Crime News : जुन्या वादातून चाकूने जीवघेणा हल्ला; चौघांविरूध्द गुन्हा दाखल

0
Crime News : जुन्या वादातून चाकूने जीवघेणा हल्ला; चौघांविरूध्द गुन्हा दाखल
Crime News : जुन्या वादातून चाकूने जीवघेणा हल्ला; चौघांविरूध्द गुन्हा दाखल

Crime News : नगर : अहिल्यानगर शहरातील (Ahilyanagar City) मध्यवस्तीत असलेल्या सांगळे गल्ली परिसरात एका इंटिरिअर डिझायनरवर जुन्या वादातून आणि हप्त्याच्या मागणीवरून चौघांनी मिळून जीवघेणा हल्ला (Life-threatening attack) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात हर्षद मुकुंद मुळे (वय ३७, रा. सातपुते तालीम शेजारी, हिवरेगल्ली, नालेगाव) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्यांनी दिलेल्या जबाबावरून चौघांविरूध्द गुन्हा दाखल (Crime News) करण्यात आला आहे.

नक्की वाचा: कोपरगाव बसस्थानकात थरार; ब्रेक फेल झाल्याने बस चढली थेट फलाटावर

गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे

संतोष शिंदे, महेश शिंदे, चिंदबर शिंदे व नटराज शिंदे (पूर्ण नावे माहिती नाही, सर्व रा. सांगळे गल्ली, अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. काही दिवसांपूर्वी संतोष शिंदे याने मुळे यांच्याकडे दरमहा २० हजार रूपये मेंटेनन्सची मागणी केली होती. ही मागणी धुडकावून लावल्याने संशयित आरोपीने त्यांना धमकी दिली.

अवश्य वाचा: शहरातील क्रीडा क्षेत्रासाठी १. १७ कोटीचा निधी मंजूर; आमदार जगताप यांच्या पाठपुराव्याला यश

चाकूने हल्ला हल्ला (Crime News)

त्यानंतर शुक्रवारी (ता. ६) कार्यालयासमोर एका मुलाला शिवीगाळ करणाऱ्या तरूणाला हटकले असता, याचा राग धरून संतोष शिंदे, महेश शिंदे, चिदंबर शिंदे आणि नटराज शिंदे यांनी मुळे यांच्यावर हल्ला चाकूने हल्ला केला. जखमी अवस्थेत मुळे यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

हे देखील वाचा: अजितदादांच्या पक्षातील मंडळी पुढील राजकारण कसं करणार?