Gram Panchayat : अहिल्यानगर तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींवर प्रशासकराज!

Gram Panchayat : अहिल्यानगर तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींवर प्रशासकराज!

0
Gram Panchayat : अहिल्यानगर तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींवर प्रशासकराज!
Gram Panchayat : अहिल्यानगर तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींवर प्रशासकराज!

Gram Panchayat : नगर : नगर तालुक्यातील एकूण ५७ ग्रामपंचायतींचा (Gram Panchayat) कार्यकाळ रविवारी (ता. ८) रोजी संपुष्टात आला आहे. त्यामुळे या सर्व ग्रामपंचायतींवर आता प्रशासकांची नियुक्ती केली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून (State Election Commission) पुढील निवडणुकांचा (Election) कार्यक्रम जाहीर न झाल्याने, तात्पुरत्या स्वरूपात प्रशासन चालवण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत आहे. प्रशासकीय राजवटीमुळे लोकप्रतिनिधी नसल्याची उणीव भासणार असली, तरी प्रशासनाने नागरिकांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलपणे पाहावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

नक्की वाचा: कोपरगाव बसस्थानकात थरार; ब्रेक फेल झाल्याने बस चढली थेट फलाटावर

८ फेब्रुवारीपासून लोकप्रतिनिधींचे अधिकार समाप्त

तालुक्यातील ग्रामीण भागात विकासकामे, दैनंदिन प्रशासकीय कामकाज तसेच शासकीय योजनांची अंमलबजावणी सुरळीत सुरू राहावी, यासाठी संबंधित ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून ग्रामसेवक अथवा अन्य पात्र अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून लवकरच निर्गमित होण्याची शक्यता आहे. सध्या कार्यरत असलेल्या सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने ८ फेब्रुवारीनंतर लोकप्रतिनिधींचे अधिकार समाप्त होतील. त्यानंतर ग्रामपंचायतींचे सर्व आर्थिक, प्रशासकीय व विकासात्मक अधिकार प्रशासकांकडे असणार आहेत. दरम्यान, अनेक ग्रामपंचायतींमध्ये रखडलेली विकासकामे, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, घरपट्टी व पाणीपट्टी वसुली तसेच विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी याकडे प्रशासकांना विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. प्रशासकीय राजवटीमुळे लोकप्रतिनिधी नसल्याची उणीव भासणार असली, तरी प्रशासनाने नागरिकांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलपणे पाहावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

हे देखील वाचा: अजितदादांच्या पक्षातील मंडळी पुढील राजकारण कसं करणार?

या गावात प्रशासकराज! (Gram Panchayat)

अहिल्यानगर तालुक्यातील अंबिलवाडी, अकोळनेर, बहिरवाडी, भोरवाडी, बुऱ्हाणनगर, चास, चिचोंडी पाटील, दरेवाडी, देहरे, देवगाव, धनगरवाडी, दशमीगव्हाण, डोंगरगण, घोसपुरी, गुंडेगाव, गुणवडी, हमीदपूर, हातवळण, हिवरेबाजार, इमामपूर, इसळक, जेऊर, कामरगाव, कर्जुने खारे, खडकी, खंडाळा, खांडके, खोसपुरी, कोल्हेवाडी, मांडवे, मांजरसुंबा, माथनी, मठपिंपरी, नवनागापूर, निंबळक, निमगाव वाघा, निमगाव घाणा, पारगाव मौला, पिंपळगाव वाघा, पिंपळगाव माळवी, पिंपरी घुमट, पोखर्डी, रतडगाव, रुईछत्तीसी, सांडवे, ससेवाडी, शहापूर, शिंगवे, शिराढोण, तांदळी वडगाव, टाकळी काझी, उदरमल, विळद, वाकोडी, वाळुंज, वारूळवाडी, वाटेफळ.