Dasakriya movement | श्रीगोंदा येथे रस्त्याच्या कामाविरोधात संभाजी ब्रिगेडचे ‘दशक्रिया आंदोलन’

0

Dasakriya movement | श्रीगोंदा: बेलवंडी फाटा ते श्रीगोंदा-जामखेड रस्त्याच्या कामात होत असलेल्या अनियिमततेविरोधात तसेच विविध मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक होऊन सोमवारी (ता.९) तहसील कार्यालय श्रीगोंदा समोरील उकरलेल्या रस्त्यावर ‘प्रतीकात्मक दशक्रिया आंदोलन (Dasakriya movement) करण्यात आले. एमएसआयडीसीच्या रस्ते एजन्सीमार्फत श्रीगोंदा शहरात सुरू असलेल्या कामाच्या दर्जाबाबत आणि नियोजनाबाबत स्थानिक नागरिक व संघटनेने प्रश्नचिन्ह उपस्थित करत संथ गतीने चाललेले काम आणि तांत्रिक त्रुटींमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

अवश्य वाचा- राहुरी नगरपरिषदेचा मोठा ठराव;दीड तास मोबाईलसह मनोरंजनांची माध्यमे राहणार बंद 

आंदोलकांच्या विविध मागण्या  (Dasakriya movement)

संभाजी ब्रिगेडने रस्ते एजन्सीमार्फत सुरू असलेले काम उच्च दर्जाचे असावे, शहरामध्ये रस्त्याच्या कडेला तातडीने साईड गटार बांधावे, नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्याच्या बाजूला फूटपाथची निर्मिती करावी, रस्त्याचे काम पूर्ण करण्यापूर्वी गॅस आणि पाणी पुरवठ्याची पाईपलाईन व्यवस्थित टाकून घ्यावी, जेणेकरून भविष्यात रस्ता पुन्हा खोदावा लागणार नाही, २७ फेब्रुवारी रोजी श्रीगोंदा येथे संत शेख महमद महाराज यात्रेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी होणार आहे.

आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा  (Dasakriya movement)

हेही वाचा- राहुरी नगरपरिषदेचा मोठा ठराव;दीड तास मोबाईलसह मनोरंजनांची माध्यमे राहणार बंद 

ही गैरसोय टाळण्यासाठी काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी करत जोपर्यंत मागण्यांचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा संभाजी ब्रिगेडचे अरविंद कापसे, नानासाहेब शिंदे यांच्यासह संतोष इथापे आणि नागरिकांनी घेतला आहे.

हे पाहा-अजितदादांनी शेवटच्या सभेत प्रचार केलेला उमेदवार झाला विजयी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here