AMC | नगर : बोल्हेगाव- नागापूर सीना नदी पात्रात अनधिकृत पत्राशेड धार्मिक स्थळ हटवण्यात आले. ही कारवाई आज (ता. ९) अहिल्यानगर महापालिकेच्या (AMC) अतिक्रमण निर्मूलन पथकाने केली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
अवश्य वाचा- राहुरी नगरपरिषदेचा मोठा ठराव;दीड तास मोबाईलसह मनोरंजनांची माध्यमे राहणार बंद
अतिक्रमण हटवण्यात आले (AMC)
यावेळी आयुक्त यशवंत डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपअभियंता सुरेश इथापे, अतिक्रमण प्रमुख आदित्य बल्लाळ, प्रभाग अधिकारी बाळासाहेब पवार, राहुल साबळे, अतिक्रमण पथक वाहन कर्मचारी जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण हटवण्यात आले.
हेही वाचा – कोरेगावच्या सरपंच निर्मला नवले यांचा धक्कादायक पराभव
इतर ठिकाणीही कारवाई (AMC)
महापालिकेच्यावतीने गेल्या आठवडाभरापासून शहरासह उपनगरांत अतिक्रमण हटाव मोहीम सुरु करण्यात आली आहे. शहरातील आशा टॉकीज चौक ते माणिक चौक, त्यानंतर जुने बसस्थानक परिसर ते माळीवाडा वेस रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात आली. उपनगरात बालिकाश्रम रस्त्यावरही असलेली अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत.
हे पहा – अजितदादांनी शेवटच्या सभेत प्रचार केलेला उमेदवार झाला विजयी
अनधिकृत धार्मिक स्थळ
सोमवार (ता.९) नागापूर उपनगर भागात ही मोहीम राबविण्यात आली. या परिसरात सीनानदी पात्रात अनधिकृत धार्मिक स्थळ (मस्जिद) उभारण्यात आले होते. पत्र्याचे शेड ठोकून उभारण्यात आलेल्या या धार्मिक स्थळावर महापालिकेच्या पथकाने कारवाई करत ते जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले. यावेळी तेथे मोठी गर्दी झाली होती. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.



