Chakkajam movement| वांबोरी येथे चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशारा

0

Chakkajam movement| राहुरी: वांबोरी व परिसरात सोलर पॉइंट उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेची वीज मिळत नसल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सध्या केवळ दोन तासच वीजपुरवठा होत असून त्यामुळे शेतीची कामे पूर्णतः ठप्प झाली आहेत. या पार्श्वभूमीवर संतप्त शेतकऱ्यांनी वांबोरी येथील वीज उपकेंद्रावर आंदोलन केले. यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी संबंधित वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या मागण्या मांडल्या. तीन दिवसांच्या आत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास वांबोरी येथे चक्काजाम आंदोलन (Chakkajam movement) छेडण्यात येईल, असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी यावेळी दिला. 

अवश्य वाचा- ‘तौरल इंडिया’ औद्योगिक भविष्याचा मैलाचा दगड; खासदार निलेश लंके यांचे प्रतिपादन

वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा (Chakkajam movement)

यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी संबंधित वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या मागण्या मांडल्या. सोलर पॉइंट असूनही शेतकऱ्यांना पुरेशी वीज न मिळणे ही गंभीर बाब असून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी त्यांनी केली. तीन दिवसांच्या आत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास वांबोरी येथे चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल, असा कडक इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी यावेळी दिला. शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा- श्रीगोंदा येथे रस्त्याच्या कामाविरोधात संभाजी ब्रिगेडचे ‘दशक्रिया आंदोलन’

यांचा आंदोलनात सहभाग (Chakkajam movement)

यावेळी शेतकरी सेनेचे रवींद्र मोरे, श्याम पटारे, बाबासाहेब भिटे, ऋषिकेश मोरे, किसन जवरे, कृष्णा पटारे,बाबासाहेब सोनवणे, संदीप निकम,गोटराम मोरे, विशाल पारख, महेश साळुंके, सुरज शर्मा, अशोक पटारे, महेश पागिरे, भाऊ रहाणे,योगेश राऊत, नारायण हुळुले, नितिन नवले, आदिनाथ मोरे, भिमा मांगुडे, सचिन गडाख, बाबुराव गांधले, रविकिरण पटारे, नारायण मोरे, सुरज मकासरे यांच्या सह वांबोरी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने यामधे सहभागी झाले होते.

हे पहा – त्रिभाषा धोरण समितीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर; आता मंत्रिमंडळात होणार मोठा निर्णय?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here