
Kashinath Date : पारनेर : पारनेर – नगर विधानसभा मतदारसंघात (Parner – Nagar Assembly Constituency) ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ (Mukhya Mantri Baliraja Shet-Panand Raste Yojana) प्रभावीपणे राबविण्यासाठी व कामांचा आढावा घेण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या क्षेत्रस्तरीय समितीची बैठक झाली. या बैठकीत शेत रस्त्यांच्या कामांना गती देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार काशिनाथ दाते (Kashinath Date) होते. उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर उपस्थित उपस्थित होते.
नक्की वाचा: अहिल्यानगर तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींवर प्रशासकराज!
शेतरस्ते म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रगतीचा मार्ग
बैठकीत प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या दळणवळणाच्या समस्या व शेत रस्त्यांची सद्यस्थिती यावर विचारविनिमय करण्यात आला. ‘शेतरस्ते म्हणजे केवळ रस्ते नसून तो शेतकऱ्यांच्या प्रगतीचा मार्ग आहे,’ या तत्त्वावर भर देत, योजनेतील कामांमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई किंवा हलगर्जीपणा प्रशासनाकडून होऊ नये, अशा स्पष्ट सूचना या बैठकीत देण्यात आल्या.

अवश्य वाचा : त्रिभाषा धोरण समितीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर; आता मंत्रिमंडळात होणार मोठा निर्णय?
संबंधित विभागाचे अधिकारी समिती सदस्य उपस्थित (Kashinath Date)
शेतकरी हा केंद्रबिंदू मानून ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. योजनेची व्याप्ती व महत्त्व लक्षात घेऊन प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी व समिती सदस्य उपस्थित होते.


