Sunetra Pawar : अजित दादांची खुर्ची पाहताच सुनेत्रा पवार भावूक; राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून स्वीकारला कार्यभार

0
Sunetra Pawar : अजित दादांची खुर्ची पाहताच सुनेत्रा पवार भावूक; राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून स्वीकारला कार्यभार
Sunetra Pawar : अजित दादांची खुर्ची पाहताच सुनेत्रा पवार भावूक; राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून स्वीकारला कार्यभार

Sunetra Pawar : नगर : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार (Sunetra Pawar) यांनी आज मंत्रालयात अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच त्या मंत्रालयात पोहोचल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, रुपाली चाकणकर यांच्यासह पक्षाचे अनेक आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

हे पहा: रोहित पवार पत्रकार परिषदेत कोणता खुलासा करणार?

सर्वजण भावूक

दालनात प्रवेश करताच सुनेत्रा पवार यांनी प्रथम खुर्चीला आणि त्यानंतर टेबलाला हात जोडून नमस्कार केला. आपल्या पतीच्या रिक्त झालेल्या जागी कार्यभार स्वीकारताना सुनेत्रा पवार काहीशा भावूक झाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या पदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आजचा दिवस राज्याच्या राजकारणात अत्यंत ऐतिहासिक आणि भावूक ठरला.

हेही वाचा: सुप्रिया सुळेंचे होणारे जावई सारंग लखानी कोण?

लोकाभिमुख कारभार करणार (Sunetra Pawar)

या ऐतिहासिक प्रसंगी श्रीमती सुनेत्रा वहिनी पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त करत, सर्वसामान्य नागरिक, महिला, शेतकरी, युवक आणि वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. राज्याच्या प्रगतीसाठी पारदर्शक, संवेदनशील आणि लोकाभिमुख प्रशासन देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. कार्यभार स्वीकारताना उपस्थित मान्यवर, वरिष्ठ अधिकारी, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.