Murder case | नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरात अडीच वर्षांपूर्वी ओंकार भागानगरे यांचा मध्यरात्री खून झाला होता. हे प्रकरण राज्यभर गाजले होते. या खून प्रकरणातील (Murder case) आरोपींपैकी एकाचा आज (ता. १०) मृत्यू झाला. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.

बालिकाश्रम रस्त्यावर खून (Murder case)
अहिल्यानगर शहरातील बालिकाश्रम रस्त्यावर १९ जून २०२३ मध्ये झालेल्या ओंकार भागानगरे व त्यांच्या मित्रांवर दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी कोयता, तलवारींच्या सहाय्याने जीवघेणा हल्ला केला. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला होता. या हल्ल्यात ओंकार भागानगरे हे गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात गणेश हुच्चे, नंदू बोराटे, संतोष सरोदे यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल झाला होता.
अवश्य वाचा – राज्य उत्पादन शुल्काच्या अहिल्यानगर जिल्हा कार्यालयाचे विभाजन; शिर्डी येथे स्वतंत्र कार्यालय

जामीन मंजूर (Murder case)
या प्रकरणात गणेश हुच्चे, नंदू बोराटे, संतोष सरोदे व त्यांचे साथीदार तुरुंगात होते. यात संतोष सरोदेला न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. जामीन मिळाल्यापासूनच तो आजारी होता. त्याच्यावर अहिल्यानगर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यानच आज त्याचा मृत्यू झाला.
त्या खून प्रकरणाची पुन्हा चर्चा (Murder case)
हे पहा – भाषेची अस्मिता म्हणजे आजार? राज ठाकरेंचा सरसंघचालकांवर तिखट वार
या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करून घेतला आहे. संतोष सरोदेच्या मृत्यूनंतर ओंकार भागानगरे खून प्रकरण पुन्हा शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.



