AMC | स्वीकृत नगरसेवकांचा फॉर्म्युला ठरला; गटनेते कोणाची शिफारस करणार

0

AMC | नगर : अहिल्यानगर महापालिकेची (AMC) सार्वत्रिक निवडणूक होऊन ६८ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यानंतर महापौर व उपमहापौराची निवड झाली. आता पहिल्या सभेत राज्य शासनाच्या निर्देशानुसार सहा स्वीकृत सदस्य निवडले जाणार आहेत. त्यासाठी शासन अध्यादेशानुसार पात्रता पूर्ण करणाऱ्या व्यक्तींचीच शिफारस संबंधित पक्षांच्या गटनेत्यांना करावी लागणार आहे. गटनेते कोणाची शिफारस करणार याकडे आता नगरकरांचे लक्ष लागले आहे. राजकीय पक्षांच्या बलाबलानुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे (NCP) तीन, भाजपचे (BJP) दोन, शिवसेनेचा (Shivsena) एक सदस्य स्वीकृत सदस्य म्हणून निवडला जाणार आहे.

हे वाचा – बहुचर्चित भागानगरे खून प्रकरणातील आरोपीचा मृत्यू; नक्की काय घडलं जाणून घ्या…

या व्यक्ती पात्र ठरणार (AMC)

नामनिर्देशित सदस्य (स्वीकृत सदस्य) म्हणून नियुक्त होण्यासाठी राज्यात नोंदणीकृत असलेला डॉक्टर, मान्यताप्राप्त शाळा किंवा महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक, व्याख्याता किंवा मुख्याध्यापक, सनदी लेखापाल (सीए), पदवीधारक अभियंता, वकील, महापालिका किंवा नगरपरिषदेत मुख्य अधिकारी, सहायक आयुक्त किंवा उपायुक्त म्हणून काम केलेला निवृत्त अधिकारी अथवा नोंदणीकृत सामाजिक संस्थेचा पदाधिकारी या घटकांपैकी एका घटकात किमान पाच वर्षांच्या कामाचा अनुभव असलेला व्यक्ती पात्र ठरणार आहे. 

अवश्य वाचा – अजित दादांची खुर्ची पाहताच सुनेत्रा पवार भावूक; राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून स्वीकारला कार्यभार

आयुक्तांकडे पात्र उमेदवारांची शिफारस (AMC)

संबंधित राजकीय पक्षाचा गटनेता आयुक्तांकडे पात्र उमेदवारांची शिफारस करतील. आयुक्तांच्या छाननीनंतर महापौरांच्या उपस्थितीत होणाऱ्या पहिल्या सभेत या स्वीकृत सदस्यांची घोषणा केली जाते. स्वीकृत सदस्यांबाबत महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती नियमानुसार, महापालिका किंवा नगरपरिषद क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आणि समाजकल्याण कार्यामध्ये गुंतलेल्या मुंबई सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियम, १९५० खाली नोंदणीकृत समाजाधिष्ठित अशासकीय संघटनेचा पदाधिकारी म्हणून किमान पाच वर्षाचा अनुभव असलेली असेल, धर्मादाय आयुक्तांनी अधिकृतरीत्या मान्यता दिल्यापासून समाजाधिष्ठित अशासकीय संघटनेचा किमान पाच वर्षाचा अनुभव अपेक्षित आहे.

हे पहा – अजितदादांच्या वारशावरून राष्ट्रवादीत यादवी?

स्वीकृतसाठी पक्ष निहाय संख्या (AMC)

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – ३

भाजप – २

शिवसेना (शिंदे गट) – १

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here