Rohit Pawar | अमोल मिटकरींनंतर आता रोहित पवारांना शंका; अजित पवार विमान अपघात प्रकरण 

0

Rohit Pawar | नगर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं २८ जानेवारी रोजी बारामती येथे एका विमान अपघातात निधन झाले. पवार कुटुंबासह महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. अजितदादांच्या निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाला आहे. या अपघातात अजितदादांसह ४ जणांचा मृत्यू झाला होता. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या निधननांतर राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. दोन दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील काही नेत्यांसह आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्याकडून हा अपघात नसून हत्या असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणात सत्य काय? याबाबत खुलासा करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

हेही वाचा – स्वीकृत नगरसेवकांचा फॉर्म्युला ठरला; गटनेते कोणाची शिफारस करणार

रोहित पवार भाष्य करणार (Rohit Pawar)

आता या प्रकरणात पवार कुटुंबातील सदस्य आणि कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार भाष्य करणार आहे. आज संध्याकाळी ४ वाजता पत्रकार परिषद घेत रोहित पवार या प्रकरणावर भाष्य करणार आहे. आज (ता. १०) सायंकाळी ४ वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी  सोशल मीडियावर दिली. त्यामुळे रोहित पवार नेमकं काय बोलणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. 

अवश्य वाचा – सेंगोलच्या इतिहासातून उलगडते ‘स्वयंभू’ची कथा – निखिल सिद्धार्थने केला मोठा खुलासा

अनेक शंका (Rohit Pawar)

या पोस्टमध्ये अजितदादांच्या दुर्दैवी निधनाबाबत महाराष्ट्रासह माझ्याही मनात अनेक शंका असून या पत्रकार परिषदेत महत्त्वाचे आणि डोळे उघडणारे मुद्दे तपशीलवार मांडणार असल्याची देखील माहिती रोहित पवार यांनी दिली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत घातपाताचा संशय नसल्याचे सांगितले होते. मात्र, आता शरद पवार गटाचेच नेते आमदार रोहित पवार संशय व्यक्त करत असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

हे पहा – ठेकेदाराचे बिल पास करण्यासाठी मागितले पैसे, उपअभियंता अडला ‘ACB’च्या जाळ्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here