HSC Board Exam : बारावीची परीक्षा सुरू ; कर्जत तालुक्यात ३ हजार १८० विद्यार्थ्यांनी दिला पेपर

HSC Board Exam : बारावीची परीक्षा सुरू ; कर्जत तालुक्यात ३ हजार १८० विद्यार्थ्यांनी दिला पेपर

0
HSC Board Exam : बारावीची परीक्षा सुरू ; कर्जत तालुक्यात ३ हजार १८० विद्यार्थ्यांनी दिला पेपर
HSC Board Exam : बारावीची परीक्षा सुरू ; कर्जत तालुक्यात ३ हजार १८० विद्यार्थ्यांनी दिला पेपर

HSC Board Exam : कर्जत : बारावीची परीक्षा (HSC Board Exam) मंगळवारपासून (ता. १०) सुरू झाली. यावेळी कर्जत तालुक्यातील एकूण आठ परीक्षा केंद्रावर इंग्रजीचा पेपर (English Paper) सुरळीत झाला असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी प्रदीप चव्हाण यांनी दिली. कर्जत तालुक्यात ३ हजार १८० विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहे. यासाठी पोलीस प्रशासनाकडून (Police Administration) चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनेक ठिकाणी शाळा प्रशासनाकडून (School Administration) परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

नक्की वाचा: राजयोगाच्या नियमित अभ्यासाने जीवन जगण्याचा दृष्टिकोन बदलतो : साधना दिदी

८ बैठे पथक नियुक्त

बारावीच्या बोर्डाची परीक्षा मंगळवार, (ता. १०) पासून सुरु झाली आहे. बारावी परीक्षेसाठी कर्जत तालुक्यातील ३ हजार १८० विद्यार्थी आठ परीक्षा केंद्रावरून पेपर देत आहेत. यासाठी १२७ वर्ग राखीव करण्यात आले आहेत. शालेय प्रशासनाकडून कॉपी मुक्त परीक्षा अभियान राबविण्यात आले आहे. यासाठी सर्वच केंद्रावर सीसीटीव्ही लावण्यात आले आहे. तसेच बारावी परीक्षेवर नजर ठेवण्यासाठी ८ बैठे पथक नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती कर्जत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रदीप चव्हाण यांनी दिली. 

अवश्य वाचा: शिर्डीत योग महोत्सव उत्साहात

महाविद्यालयात मदत केंद्र स्थापन (HSC Board Exam)

इंग्रजीचा आज पहिला पेपर होता. तो सुरळीत पार पडला असून आठ केंद्रावर कुठे ही परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून अथवा त्यांच्या पालकांकडून गैरप्रकार घडला नाही. कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालयात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देत प्राचार्य डॉ संजय नगरकर यांनी स्वागत केले. तसेच सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षेला धाडसाने व आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासंदर्भात शपथ दिली. परीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांना काही अडचण आल्यास महाविद्यालयात मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे.