Bicycle delivery| पारनेर: आमदार काशिनाथ दाते यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या सेस फंडातून जवळे येथील श्री धर्मनाथ विद्यालयातील १० विद्यार्थ्यांना सायकल वितरण (Bicycle delivery) करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार दाते यांचे चिरंजीव मंगेश दाते हे प्रमुख उपस्थित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सोयी उपलब्ध व्हाव्यात, शाळेत ये–जा करणे सुलभ व्हावे आणि विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास (Educational travel) अधिक गतीमान व्हावा, या उद्देशाने ही सायकल वाटप योजना राबविण्यात येत असल्याचे दाते यांनी यावेळी स्पष्ट केले.
अवश्य वाचा- आदर्श गाव मांजरसुंबात ग्रामस्वच्छतेसाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचा सहभाग
जवळे गावच्या विकासासाठी नेहमीच झुकते माप (Bicycle delivery)
या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती किसन रासकर, रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभाग सल्लागार समन्वयक संदीप सालके, संभाजी काका सोमवंशी, प्रदीप सोमवंशी, संतोष सालके, मंगेश सालके, कैलास शेळके, संपतराव सालके, गोपाळे काका, सोनालीताई ढवळे, महेंद्र पठारे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मंगेश दाते म्हणाले, आमदार काशिनाथ दाते हे सातत्याने समाजातील विविध घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून जवळे गावच्या विकासासाठी त्यांनी नेहमीच झुकते माप दिले आहे.
नक्की वाचा- अकोले पंचायत समितीच्या महिलांनी कोरले चॅम्पियनशीप ट्रॉफी
पुढील वर्षी अधिकाधिक विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देणार (Bicycle delivery)
ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेच्या युगात सक्षमपणे उभे राहावेत, यासाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर आमदार दाते यांचा नेहमीच भर राहिला आहे. यावर्षी धर्मनाथ विद्यालयातील मागणी अर्जच मर्यादित होते. त्यामुळे कमी विद्यार्थ्यांना सायकल अनुदानाचा लाभ मिळाला असला, तरी पुढील वर्षी अधिकाधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.



