
Ram Shinde : नगर :
श्री क्षेत्र चौंडी (Choundi) प्रकल्पाचे काम गतीने होण्यासाठी या प्रकल्पाचे (Project) उपविभाग करून टप्या टप्याने परवानग्या घेण्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी, अशी सूचना विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी दिली.
हे वाचा : पक्ष विरोधी भूमिका घेतलेल्या तब्बल ६९ जणांची भाजपमधून हकालपट्टी
विधानभवनात बैठकीचे आयोजन
विधानभवनात श्री क्षेत्र चौंडी प्रकल्पाच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी संबंधित अधिकारी व अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
नक्की पहा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार दिल्लीत; मोदी-शाह यांची घेतली भेट
अंमलबजावणीत विलंब नको (Ram Shinde)
बैठकीत प्रकल्पाच्या अंमलबजावणीस विलंब न होता सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे जावे, असेही सभापती प्रा.शिंदे यांनी सांगितले. श्री क्षेत्र चौंडी प्रकल्पाचे कामाबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.


