Admission : सिपेट छत्रपती संभाजीनगरमध्ये रोजगारक्षम अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू

0
Admission : सिपेट छत्रपती संभाजीनगरमध्ये रोजगारक्षम अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू
Admission : सिपेट छत्रपती संभाजीनगरमध्ये रोजगारक्षम अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू

Admission : नगर : भारत सरकारच्या (Central Government) रसायन व खत मंत्रालयाच्या अधिपत्याखालील केंद्रीय पेट्रोरसायन अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था (सिपेट) येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विविध पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया (Admission Process) सुरू झाली आहे. या अभ्यासक्रमांसाठी २८ मे २०२६ पर्यंत अर्ज (Application) करण्याची मुदत असून, यासाठीची अखिल भारतीय सामायिक प्रवेश परीक्षा ७ जून २०२६ रोजी घेतली जाणार आहे.

हे वाचा : केसनंद येथील 65 एकर जमीन प्रकरणी 8 दिवसांत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे सभापतींचे निर्देश

संशोधन कार्यात महत्त्वपूर्ण योगदान

​सिपेट ही संस्था देशातील व राज्यातील प्लास्टिक उद्योगांना तांत्रिक साहाय्य, कुशल मनुष्यबळ निर्मिती व संशोधन कार्यात महत्त्वपूर्ण योगदान देते. संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रात रोजगाराभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

नक्की पहा: ड्रग्ज माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांचा ‘मास्टरप्लॅन’!

जास्तीत जास्त संख्येने प्रवेश घेण्याचे आवाहन (Admission)

यामध्ये डिप्लोमा इन प्लास्टिक टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्लास्टिक प्रोसेसिंग अँड टेस्टिंग व पोस्ट डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड डिझाइन या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. विशेष म्हणजे दहावी, बारावी किंवा विज्ञान शाखेतील पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणारे विद्यार्थीही निकालाची वाट न पाहता या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. या तांत्रिक व रोजगार देणाऱ्या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने प्रवेश घ्यावा, असे आवाहन सिपेटचे प्रशिक्षण प्रमुख आर. जीवन राम यांनी केले आहे. प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी ९३७३६८७९१५ किंवा ०२४०-२४७८३२२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.