Marathi Language Promotion Fortnight| वाचनामुळेच समृद्ध आणि सुजाण पिढी घडते: गडकरी

विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पुस्तके वाचावीत

0

Marathi Language Promotion Fortnight | पारनेर: “पुस्तक वाचनातून मिळणारे ज्ञान हे सर्वोत्तम असते. वाचनामुळेच समाजात समृद्ध आणि सुजाण पिढी घडत असते. आम्ही स्वतः वाचनाच्या जोरावरच अधिकारी झालो आहोत,” असे प्रतिपादन सुपा पोलिस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक (Police inspectar) ज्योती गडकरी यांनी केले. शहाजापूर येथील कौडेश्वर सार्वजनिक वाचनालयात महाराष्ट्र शासनाच्या ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा’ (Marathi Language Promotion Fortnight) निमित्त आयोजित निबंध व चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात त्या बोलत होत्या. 

अवश्य वाचा- अहिल्यानगरच्या ‘या’ भागातील शेतकऱ्यांवर महावितरणच्या निर्णयाची कुऱ्हाड; दोनच तास मिळणार वीज

विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पुस्तके वाचावीत (Marathi Language Promotion Fortnight)

    कौडेश्वर वाचनालयाच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना गडकरी म्हणाल्या की, जिल्हा परिषद शाळेत मिळालेले पायाभूत ज्ञान आणि शालेय जीवनात लागलेली वाचनाची गोडीच माणसाला आयुष्यात यशाच्या शिखरावर घेऊन जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पुस्तके वाचली पाहिजेत. यामुळे केवळ मराठी भाषेची गोडीच निर्माण होणार नाही, तर वाचनाची आवडही वृद्धिंगत होईल. शहाजापूरसारख्या छोट्या गावात इतके समृद्ध ग्रंथालय असणे ही अभिमानाची गोष्ट आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि टीव्हीचा अतिवापर टाळून पुस्तकांशी मैत्री करावी, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तक आणि गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. निबंध स्पर्धा: आदिती दीपक म्हस्के (प्रथम), आदिती अंकुश म्हस्के (द्वितीय), प्रेमराज मच्छिंद्र जाधव (तृतीय). चित्रकला स्पर्धा: आयुष संतोष सकट (प्रथम), तन्वी प्रमोद म्हस्के (द्वितीय), श्रेयश चिंतामण बेंद्रे (तृतीय). 

नक्की वाचा- श्री साईबाबा संस्थानला साईभक्ताने देणगी स्वरूपात स्कूल बस केली अर्पण

सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन प्रोत्साहन (Marathi Language Promotion Fortnight)

याव्यतिरिक्त सर्व सहभागी विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्रे देऊन प्रोत्साहन देण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलनाने झाली. वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेंद्र शिंदे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. सरपंच संगीता मोटे यांनी पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी आणि पीएसआय शिवले यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला माजी सरपंच अण्णासाहेब मोटे, विशाल सकट, अर्चना हंडोरे, रावसाहेब मोटे, जगन्नाथ सकट, आकाश मोटे, उत्तम सकट, शिवाजी मोटे, मोरे मॅडम यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण पवार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here