Ahilyanagar | नगर : राज्यात २०१५मध्ये शालेय पोषण आहारात चिक्की गाजला होता. या चिक्की घोटाळ्याची मूळ अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातीलच. आता पुन्हा चिक्की घोटाळ्याची आठवण करून देणारी घटना मंगळवारी समोर आली. रात्रीच्या अंधारात पोलिसांच्या वाहनांचा ताफा अहिल्यानगरच्या रेल्वे पुलावरून केडगाव देवी रस्त्याने निघाला. हा ताफा एका गोदामात जवळ पोहोचला पोलिसांनी अचानक एका गोदामावर छापा टाकला आणि पोलिसांनाही आश्चर्याचा धक्काच बसला. या गोदामात काय होत? त्यामुळे चिक्की घोटाळ्याची आठवण का होतेय? चला जाणून घेऊ…
हे वाचा – पाथर्डी पंचायत समितीत घाणीचे साम्राज्य; प्रशासनाचे दुर्लक्ष
साठा एकत्र सापडला (Ahilyanagar)
अहिल्यानगर-पुणे रस्त्यावरील केडगाव परिसरात एका गोदामात महिला बालकल्याण विभागाचा पोषण आहार व कृषी विभागाच्या शासकीय बियाण्यांचा साठा एकत्र सापडला आहे. हा शासनाचा साठा तेथे गेला कसा? याबाबत महिला बालविकास विभाग व अन्न प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. मात्र, शहरात या घटने पाठोपाठ चिक्की घोटाळ्याच्या आठवणी ताज्या झाल्या. कारण शालेय पोषण आहार ही चिक्की दिली जात होती. तसाच काहीसा प्रकार हा नाही ना, अशी चर्चा रंगू लागली आहे.
अवश्य वाचा – बांगलादेशी कामगार आढळल्यास कामावर ठेवणाऱ्यांवर होणार कडक कारवाई
जिल्हा परिषद व अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले (Ahilyanagar)
अहिल्यानगर-पुणे रोडवरील रेल्वे – उड्डाणपुलाजवळील एका गोदामात पोषण आहाराचा साठा असल्याची माहिती मंगळवारी रात्री उशिरा कोतवाली पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा टाकला असता तेथे महिला बालकल्याण विभागाचा पोषण आहार आढळून आला. अधिक तपासणी केली असता कृषी विभागाचे बियाण्यांचे पॅकेटही मिळाले. पोलिसांनी तत्काळ जिल्हा परिषद व अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. त्यांच्याकडून मालाची तपासणी करण्याचे काम सुरू होते. शासकीय माल येथे कसा गेला, तो कुणी आणला, त्यामागे काय उद्देश होता, याबाबत चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
हे पहा – अजितदादांबद्दलची मुंबईत न सांगितलेली गोष्ट रोहित पवारांनी दिल्लीत जाऊन सांगितली…
पाकिटांवर महिला बालविकास विभाग असा उल्लेख (Ahilyanagar)
साठ्यातील पाकिटांवर महिला बालविकास विभाग असा उल्लेख आहे. दीडर बॅग व दोन हजार बियाणांची पोती सापडल्याची माहिती आहे. महिला बालविकास विभागाचा पोषण आहार अंगणवाडीतील मुलांसाठी असतो. हे गोदाम खासगी आहे. तेथे हा माल कसा आला? हा प्रश्न आहे. येथे जनावरांसाठी भरडा तयार करण्याचा उद्योग आहे. या भरड्यात शालेय पोषण आहार आला कोठून यावर सध्या शहरात चर्चा रंगली आहे. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आमच्या पेजला फॉलो करा.



