Knife Attack | नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरातील कल्याण रस्त्यावर किरकोळ वादातून दोघा मित्रांवर चाकूने हल्ला (Knife Attack) करून जखमी केल्याची घटना समोर आली आहे. गणेश किरण बोरूडे (वय २३, रा. बोरूडे मळा, बालिकाश्रम रस्ता) व इंद्रजित राहिंज (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) हे दोघे जखमी झाले आहेत. जखमी गणेश बोरूडे यांनी उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे वाचा – पाथर्डी पंचायत समितीत घाणीचे साम्राज्य; प्रशासनाचे दुर्लक्ष
गुन्हा दाखल करण्यात आला (Knife Attack)
सनी राजेंद्र जाधव, प्रथमेश पठारे, समीर सय्यद व प्रणव दाणे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश बोरूडे आणि त्यांचा मित्र इंद्रजित राहिंज हे दुचाकीवरून जात असताना टांगा पुढे घेण्याच्या कारणावरून सनी जाधव याच्याशी त्यांचा वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून, गणेश व्दारका लॉन्स परिसरात आले असता सनी जाधव, प्रथमेश पठारे, समीर सय्यद आणि प्रणव दाणे यांनी त्यांना गाठले. तू खूप माजला आहेस का, असे म्हणत शिवीगाळ करून मारहाण केली.
हे पहा – अजितदादांबद्दलची मुंबईत न सांगितलेली गोष्ट रोहित पवारांनी दिल्लीत जाऊन सांगितली…
चाकूने वार करून गंभीर जखमी केले (Knife Attack)
हल्ल्या दरम्यान, गणेश जीव वाचवण्यासाठी पळत असताना समीर सय्यद याने त्यांच्या पाठीवर चाकूने वार केले. आपल्या मित्राला वाचवण्यासाठी इंद्रजित राहिंज मध्यस्थी करण्यासाठी गेला असता, प्रणव दाणे याने त्याच्या चेहऱ्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले, केल्याचे फिर्यादित म्हटले आहे.



