Tushar Suryabhan Salve : नगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह (Dr. Babasaheb Ambedkar Government Hostel for Backward Class Children), संगमनेर येथील माजी विद्यार्थी तुषार सूर्यभान साळवे (Tushar Suryabhan Salve) यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) तालुका कृषी अधिकारी (वर्ग–१/गट-ब) या पदावर निवड झाली आहे.
नक्की वाचा: उपमहापौर धनंजय जाधव यांच्याकडून महापालिका रुग्णालयाची अचानक पाहणी
संगमनेर येथे वास्तव्यास असताना केली स्पर्धा परीक्षेची तयारी
श्री. साळवे यांनी समाजकल्याण वसतीगृह, संगमनेर येथे वास्तव्यास असताना स्पर्धा परीक्षेची तयारी केली. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास व जिद्दीच्या बळावर त्यांनी हे उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
अवश्य वाचा: बांगलादेशी कामगार आढळल्यास कामावर ठेवणाऱ्यांवर होणार कडक कारवाई
वसतीगृहातील कर्मचारी वर्गाचे मोलाचे सहकार्य (Tushar Suryabhan Salve)
या यशामागे वसतीगृहातील संस्कार, मार्गदर्शन व प्रेरणादायी वातावरणाचा मोठा वाटा आहे. तसेच, विद्यार्थ्यांना आपुलकीने जपणाऱ्या दीपाली गांगुर्डे (स्वयंपाकी), मार्गदर्शक श्री. महानोर व अनिल गर्जे तसेच वसतीगृहातील इतर कर्मचारी वर्गाचे मोलाचे सहकार्य त्यांना लाभले.
हे देखील वाचा: अहिल्यानगरच्या कोठला भागात गोळीबार; एक युवक जखमी
या यशाबद्दल समाजकल्याण आयुक्त श्रीमती दीपा मुधोळ, प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ, सहाय्यक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार यांनी श्री. साळवे यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
श्री. साळवे यांच्या या यशामुळे समाजकल्याण विभागाचा गौरव वाढला असून, ही यशोगाथा वसतीगृहातील तसेच इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.



