
Deportation : नगर : राहाता तालुक्यातील ममदापूर व लोणी परिसरात गोवंश जनावरांची कत्तल (Slaughter of Cows) करणारी टोळी १८ महिन्यांकरिता हद्दपार (Deportation) करण्यात आले आहे, असे आदेश पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांनी दिले आहेत.
अवश्य वाचा: बांगलादेशी कामगार आढळल्यास कामावर ठेवणाऱ्यांवर होणार कडक कारवाई
हद्दपार केलेल्या संशयित आरोपींची नावे
टोळी प्रमुख फैजान जब्बार कुरेशी (शेख), वय २५, रा. कुरेशी मोहल्ला,ममदापुर,ता.राहाता,जि. अहिल्यानगर), टोळी सदस्य मुन्तजीर मुनिर कुरेशी (वय २३), अब्दुलकरीम अमिर कुरेशी, वय ५२), मुनिर अमिर कुरेशी (वय ५६), जब्बार हसन कुरेशी (शेख) वय २३), नाजीम आयुब कुरेशी वय ३३), वसीम आयुब कुरेशी (वय २७), रिजवान महेबुब कुरेशी (वय २५), वर्षे, असे हद्दपार केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
हे देखील वाचा: अहिल्यानगरच्या कोठला भागात गोळीबार; एक युवक जखमी
टोळीची गुंडगिरी व गुन्हेगारीवृत्ती चालली होती वाढत (Deportation)
याबाबत लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी हद्दपारचा प्रस्ताव शिर्डीचे उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्याकडे पाठवला होता. त्यानुसार पोलीस अधीक्षकांकडे हद्दपारचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता त्यानुसार त्यांनी १८ महिन्याकरिता संबंधितांना हद्दपार केले आहे.
राहाता तालुक्यातील ममदापुर व लोणी परिसरात सर्वसामान्य नागरीकांमध्ये दहशत निरतंर राहण्याकरीता गैर कायदयाची मंडळी जमवुन खुनाचा प्रयत्न करणे, अवैधरित्या गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतुक करणे, प्राण्यांना क्रुरतेने वागविणे, गोवंशीय जनावरांची कत्तल करुन गोमांसची वाहतुक करणे व इतरांचे जिवीत किंवा व्यक्तीगत सुरक्षीतता धोक्यात आणणे असे गुन्हे सराईतपणे केलेले असुन दिवसेंदिवस टोळीची गुंडगिरी व गुन्हेगारीवृत्ती वाढतच चालली होती.
त्या अनुषंगाने लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी संबंधित टोळी विरोधात हद्दपारचा प्रस्ताव शिर्डीचे उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्याकडे दाखल केला. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी सदरचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे दाखल केला त्यानुसार गैरकृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी टोळीप्रमुख व टोळी सदस्य यांचे विरुध्द जिल्हयातुन १८ महिन्यांकरीता हद्यपार केले बाबतचे आदेश पारीत केलेले आहेत.


