Motion Against Rahul Gandhi: राहुल गांधींनी (Rahul Gandhi) संसदेत निराधार विधाने करून देशाची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप (Accusation) भाजप खासदार निशिकांत दुबे (BJP MP Nishikant Dubey) यांनी केला आहे.त्यामुळे राहुल गांधींचे संसदेचे सदस्यत्व त्वरित रद्द करण्यात यावे आणि त्यांच्यावर निवडणूक लढवण्यास कायमची बंदी घालण्यात यावी,अशी मागणी देखील दुबे यांनी केली आहे. दुबे यांनी यासाठी लोकसभेत ‘स्वतंत्र प्रस्ताव’ (Substantive Motion) सादर केला आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा: ‘मनभेद विसरून सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी उभे राहू’- धनंजय मुंडे
‘राहुल गांधी देशाची दिशाभूल करतात’ (Motion Against Rahul Gandhi)
खासदार दुबे यांनी संसदेच्या बाहेर माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. देशाला धोका असणाऱ्या जॉर्ज सोरोस या शक्तींच्या मदतीने राहुल गांधी देशाची दिशाभूल करत आहेत. राहुल गांधी यांच्याविरोधात लोकसभेत प्रस्ताव मांडला आहे’,अशी माहिती दुबे यांनी दिली.
अवश्य वाचा: राहुरी नगरपरिषदेचा मोठा ठराव;दीड तास मोबाईलसह मनोरंजनांची माध्यमे राहणार बंद
राहुल गांधींच्या विरोधात हक्कभंग ऐवजी स्वतंत्र प्रस्ताव (Motion Against Rahul Gandhi)
राहुल गांधी यांनी लोकसभेत भाषण करताना केंद्र सरकारने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत करारात देश विकला, असा आरोप केला होता. यानंतर आक्रमक झालेल्या भाजपने त्यांच्याविरोधात मांडलेल्या प्रस्तावामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष तीव्र होणार आहे. सभागृहात निराधार विधाने करून लोकसभेची दिशाभूल केल्याचा आरोप करत केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी राहुल गांधींविरोधात ‘हक्कभंग नोटीस’ दाखल करण्याचे संकेत दिले होते. मात्र दुबेंनी हक्कभंग ऐवजी ‘स्वतंत्र प्रस्ताव’मांडण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाद्वारे गंभीर विषयावर सभागृहात सविस्तर चर्चा घडवून आणता येते.



