Dr. Bhagyashree Tilekar : राहुरी : शिक्षणामुळे (Education) आत्मविश्वास वाढतो. त्याकडे दुर्लक्ष न करता विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्षेत्रातील परिपूर्ण ज्ञान मिळविणे अत्यंत आवश्यक आहे .आत्मनिर्भर असणे सुंदर असण्यापेक्षा जास्त महत्वाचे असते असे प्रतिपादन उद्योजिका डॉ. भाग्यश्री टिळेकर (Dr. Bhagyashree Tilekar) यांनी केले. लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय (Loknete Ramdas Patil Dhumal College of Arts, Science and Commerce), राहुरी येथील स्टार्टअप आणि इनोव्हेशन सेल आयोजित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्टार्टअप टॉक सेरीज अंतर्गत नवउद्योजकांशी संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
नक्की वाचा: स्पर्धेच्या युगामध्ये शैक्षणिक योगदान महत्वाचे : डॉ. विलास खर्चे
राज्यातील 27 जिल्ह्यात त्यांच्या संस्था कार्यरत
पृथशक्ती महिला एफपीसी फेडरेशनच्या अध्यक्ष व कृषी व्यवसायातून हजारो महिलांना आत्मनिर्भर बनविणाऱ्या उद्योजिका डॉ. भाग्यश्री टिळेकर यांनी समारोप समारंभात मार्गदर्शन केले. कृषी क्षेत्रातील नवनवीन उद्योगांच्या संधी व त्यातील अफाट क्षमता याविषयी त्या बोलत होत्या. महाराष्ट्र राज्यातील 27 जिल्ह्यात कार्यरत असलेल्या त्यांच्या शिखर संस्थेच्या सभासद शेतकरी उत्पादक कंपन्याद्वारे सुमारे 93 हजार शेतकरी जोडले गेले आहेत. त्यांनी देशातील पहिली महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांची राज्यस्तरीय नोडल संस्था सुरु केली आहे. जेथून शेती क्षेत्रात शेकडो महिला उद्योजिका तयार झाल्या आहेत. या कार्याची दखल वेळोवेळी केंद्र व राज्य शासनानेही घेतली आहे. अनेक महिला शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविणारा त्यांचा प्रेरणादायी प्रवास त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांसमोर उलगडला.
अवश्य वाचा: टी-20 विश्वचषकात आज भारत-नामिबिया भिडणार; अभिषेक शर्माच्या खेळण्याबाबत साशंकता
व्यवसाय क्षेत्रात आत्मविश्वासाने उतरण्याचे आवाहन (Dr. Bhagyashree Tilekar)
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता वेताळ यांनी मुलांसोबत मुलींनीही उद्योग व्यवसाय क्षेत्रात आत्मविश्वासाने उतरण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात सर्व विद्याशाखेतील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कृषी क्षेत्रातील उद्योग व्यवसायांचे स्वरूप, शासनाच्या विविध योजना, इंटर लिंकिंग बिझनेस, परदेशातील निर्यात इत्यादी विषयी विद्यार्थ्यांनी वक्त्यांना प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन केले. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजक बनण्याची मानसिकता तयार व्हावी तसेच स्टार्टअप संस्कृती विकसित व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम समन्वयक प्रा.महेश शेळके यांनी प्रास्ताविक केले. प्रा.संदीप मगर यांनी आभार मानले.



