Accident : शैक्षणिक सहलीच्या बसचा अपघात; तीन शिक्षकांसह विद्यार्थी जखमी

Accident : शैक्षणिक सहलीच्या बसचा अपघात; तीन शिक्षकांसह विद्यार्थी जखमी

0
Accident : शैक्षणिक सहलीच्या बसचा अपघात; तीन शिक्षकांसह विद्यार्थी जखमी
Accident : शैक्षणिक सहलीच्या बसचा अपघात; तीन शिक्षकांसह विद्यार्थी जखमी

Accident : नेवासा : नेवासा येथील शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीच्या (Educational Trip) बसला गुरुवार (ता.12) रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास ओतूर येथे अपघात (Accident) झाला. डुंबरवाडीजवळ चालत्या बसचे टायर फुटून झालेल्या अपघातात बस (ST Bus) पलटी होऊन यामध्ये दोन शिक्षकांसह एक शिक्षिका तसेच 11 शालेय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली आहे.

अवश्य वाचा: आत्मनिर्भर असणे सुंदर असण्यापेक्षा जास्त महत्वाचे:  डॉ. भाग्यश्री टिळेकर

ओझरजवळ अपघात

या अपघाताची माहिती मिळताच शहाली पिंप्री गावचे सरपंच सतिष चंदन यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी विद्यार्थी व शिक्षकांची भेट घेवून मदतीचा हात दिला. याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, शहाली पिंप्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इयत्ता तिसरी ते सातवी या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल गुरुवारी पहाटे शिवनेरी, लेण्याद्री,ओझरला जाण्यासाठी निघालेली असताना या बसला ओझरजवळ अपघात झाला. या अपघातात 14 जण जखमी झाले असून जखमींमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह शिक्षकांचाही समावेश आहे. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी चालकाला डुलकी लागल्यामुळेच हा अपघात झाल्याची चर्चा अपघातस्थळी सुरु होती.

नक्की वाचा: स्पर्धेच्या युगामध्ये शैक्षणिक योगदान महत्वाचे : डॉ. विलास खर्चे

टायर फुटल्यामुळे बस पलटी (Accident)

नेवासा तालुक्यात शहाली पिंप्री हे गाव असून नेवासे बस आगाराऐवजी शेवगांव आगाराची बस (क्र.एम.एच 14 एल. एक्स.6747) ही या शालेय विद्यार्थ्यांना घेवून गेलेली असून नेवासे तालुक्याच्या सहलीत शेवगाव आगाराची ही बस कशी आली अशीही चर्चा आता सुरु झाली आहे. या झालेल्या अपघातात एका विद्यार्थांच्या बरगडीला तसेच एका विद्यार्थ्याच्या हाताचा कोपरा फॅक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे. या बसचे टायर फुटून बसने पलटी घेतल्यामुळे ही बस रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली. अपघातग्रस्तांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती सरपंच सतिष चंदन यांनी दिली.