AMC | बुरुडगाव रस्त्यावरील ‘पे अँड पार्क’ योजनेला विरोध; नगरसेविका मीना चोपडा यांचे आयुक्तांकडे निवेदन

0

AMC | नगर : अहिल्यानगर महानगरपालिकेने (AMC) बुरुडगाव रोडवरील अहिंसा चौक ते आनंदधाम चौक या मार्गावर ‘पे अँड पार्क’ योजना लागू करण्याचा प्रस्ताव मांडला असून या निर्णयाला नगरसेविका मीना चोपडा यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या संदर्भात नगरसेविका चोपडा यांनी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन सादर करत शहरातील नागरिक व भाविकांच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा – कामगारविरोधी ‘लेबर कोड’ रद्द करा; संगमनेरमध्ये विविध संघटनांचा एल्गार

धार्मिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाचा रस्ता (AMC)

निवेदनात नगरसेविका मीना चोपडा यांनी स्पष्ट केले आहे की, “अहिंसा चौक ते आनंदधाम चौक परिसर हा धार्मिक व सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत संवेदनशील भाग आहे. येथे जैन समाजाचे राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंदऋषीजी म.सा. यांची समाधी आहे. देशभरातून दररोज हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. या स्थळावर दररोज प्रार्थना, प्रवचन, ध्यान साधना आणि धार्मिक उपक्रम पार पडतात. त्यामुळे हा परिसर नेहमीच भक्तिमय आणि शांत वातावरण असलेला आहे.

अवश्य वाचा – शैक्षणिक सहलीच्या बसचा अपघात; तीन शिक्षकांसह विद्यार्थी जखमी

मीना चोपडा यांची मागणी (AMC)

त्या पुढे म्हटलं आहे की, “या परिसरात ‘पे अँड पार्क’ योजना राबवल्यास वाहनांच्या वर्दळीमुळे आवाज, धूर, वाद आणि गोंधळ वाढून धार्मिक वातावरणाचे पावित्र्य भंगेल. विशेषतः प्रार्थना, ध्यान आणि कार्यक्रमांच्या वेळी होणारी गर्दी व वाद यामुळे नागरिक आणि भाविक दोघेही त्रस्त होतील.

मीना चोपडा यांनी सांगितले की, “आपल्या कार्यालयाद्वारे ११ फेब्रुवारी २०२६ रोजी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनंतर शहरातील अनेक धर्मगुरू, जैन समाजातील प्रतिष्ठित मंडळी आणि भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या ठिकाणी ‘पे अँड पार्क’ सुरू केल्यास धार्मिक स्थळाची शांतता भंग होईल आणि भाविकांमध्ये प्रशासनाविषयी असंतोष निर्माण होईल.

द्धेचा विचार करून योग्य निर्णय घ्या (AMC)

त्यांनी नमूद केले की, “महापालिकेने नागरिकांचा आणि श्रद्धेचा विचार करून योग्य निर्णय घ्या. शहरात पार्किंगसाठी इतर अनेक जागा उपलब्ध आहेत; मात्र धार्मिक ठिकाणाजवळ अशा योजनांचा अंमल अन्यायकारक आहे.

“अहिंसा चौक ते आनंदधाम चौक तसेच आनंदधाम चौक ते माजी केंद्रीय राज्य मंत्री स्व. दिलीप गांधी यांच्या निवासस्थानापर्यंत प्रस्तावित चारचाकी व दुचाकी ‘पे अँड पार्क’ योजना रद्द करण्यात यावी.

त्या म्हणाल्या, “नागरिकांची श्रद्धा आणि धार्मिक भावना दुखावणारे कोणतेही पाऊल आम्ही सहन करणार नाही. शहर विकास आणि धार्मिक संवेदना या दोन्हींचा समतोल राखला गेला पाहिजे.

हे पहा – विद्यार्थिनीच्या धाडसाला सलाम! स्वतःच्या अपहरणाचा डाव उधळला…

अहिंसा चौक ते आनंदधाम चौक या मार्गावर मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असते. येथे शाळा, व्यावसायिक आस्थापने, तसेच आनंदधाम धार्मिक स्थळ असल्याने दररोज हजारो भाविकांचा ओघ असतो. पार्किंगची सशुल्क योजना लागू केल्यास केवळ वाहतुकीचा अडथळा निर्माण होणार नाही, तर स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन हालचालीतही अडथळा येईल, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. नागरिकांचा विश्वास आहे की, प्रशासन नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन धार्मिक स्थळाजवळ अशा प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी करणार नाही.

शेवटी त्यांनी म्हटले की, महापालिकेच्या विकास योजना स्वागतार्ह आहेत; मात्र धार्मिक स्थळे, समाधी स्थळे, आणि श्रद्धास्थानांच्या परिसरातील शांती अबाधित राखली पाहिजे. येथे ‘पे अँड पार्क’ राबवणे म्हणजे भाविकांच्या श्रद्धेवर गदा आणणे आहे. मी प्रशासनाला विनंती करते की नागरिकांच्या भावनांचा आदर ठेवून हा प्रस्ताव तातडीने मागे घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here