Nitin Shirsath | नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात २४ तासांच्या आत गोळीबाराच्या दोन घटना घडल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पत्नीला उपचारासाठी घोडेगाव (ता. नेवासा) येथे घेऊन आलेल्या नितीन शिरसाठची (Nitin Shirsath) हत्या (Murder) करण्यात आली. जखमी अवस्थेतील नितीनचा विरोधक सुरेश फुलमाळीला ज्या रुग्णालयात नेले त्या रुग्णालयात नितीनचे समर्थक व फुलमाळी समर्थक गटात राडा झाला. पोलिसांनी नितीन शिरसाठ खून प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
हेही वाचा – बुरुडगाव रस्त्यावरील ‘पे अँड पार्क’ योजनेला विरोध; नगरसेविका मीना चोपडा यांचे आयुक्तांकडे निवेदन
शिरसाठचा उपचारादरम्यान मृत्यू (Nitin Shirsath)
अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगरमहामार्गावरील घोडेगाव (ता. नेवासे) येथील घोडेश्वरी रुग्णालयात पत्नीस उपचारासाठी घेऊन आलेल्या वांजोळी येथील नितीन शिरसाठ यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी गावठी पिस्तुलातून तीन ते चार गोळ्या जवळून झाडल्याने जखमी शिरसाठचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अवश्य वाचा – शैक्षणिक सहलीच्या बसचा अपघात; तीन शिक्षकांसह विद्यार्थी जखमी
पोलिसांचा ताफा तळ ठोकून (Nitin Shirsath)
या घटनेत सुरेश फुलमाळीच्या पाठीला गोळी लागली आहे. त्याच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू असल्याचे समजते. घटनेनंतर एकच धांदल उडाल्याने परिसरातील व्यावसायिकांनी पटापट दुकाने बंद करून घर गाठले. सहायक पोलीस निरीक्षक आशिष शेळके, सहायक पोलीस निरीक्षक मोरे व पोलिसांचा मोठा ताफा गावात तळ ठोकून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
४२ तासांत दुसरी घटना (Nitin Shirsath)
सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४२ तासांत दोन खून व दोन गावात गोळीबाराची घटना घडली आहे. तीन दिवसांपूर्वी अंमळनेर गावात बारावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर गोळीबाराची घटना ताजी असताना आज घोडेगावात झालेल्या गोळीबाराने तालुका हादरून गेला आहे.
घोडेगाव बसस्थानकाजवळ असलेल्या रुग्णालयात सायंकाळी दोन अज्ञात व्यक्ती आल्या, गर्दीत असलेल्या शिरसाठ यांच्यावर पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या. अचानक घडलेल्या घटनेने रुग्ण व ग्रामस्थांची धावपळ उडाली. काही वेळातच सहायक पोलीस निरीक्षक अनिल मोरे व पोलीस पथक घटनास्थळी आले.
हे पहा – सीसीटीव्हीमध्ये ‘कॉपी’चा महापूर दिसला अन् 19 जणांची सुट्टी…
रुग्णालयात राडा (Nitin Shirsath)
जखमी झालेल्या सुरेशला घेऊन त्यांचे समर्थक अहिल्यानगरमधील एका खासगी रुग्णालयात गेले. तत्पूर्वी नितीन शिरसाठ समर्थक व विरोधकांत घोडेगावमध्ये तुफान राडा झाला. दोन्ही गटातील जखमींना अहिल्यानगर शहरातील एकाच खासगी रुग्णालयात आणण्यात आले. रुग्णालयाच्या दारात समोरासमोर येताच पुन्हा भिडले. रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखत दोन्ही गटांना वेगळे केले. तेवढ्यात पोलीसही रुग्णालयात दाखल झाले. नितीन शिरसाठ मृत झाल्याचे घोषित करताच पोलिसांनी दुसऱ्या गटातील दोन आरोपींना ताब्यात घेतले.



