
Dr. Sujay Vikhe Patil : राहाता : ओम साई राम’च्या (Om Sai Ram) अखंड जयघोषात आणि भक्तीमय वातावरणात शिर्डीत यंदाचा साई परिक्रमा महोत्सव अत्यंत उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडला. देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच विदेशातून (Abroad) आलेल्या लाखो भाविकांच्या उपस्थितीत शिर्डी (Shirdi) नगरीत श्रद्धा, भक्ती आणि सेवाभावाचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळाला, असे डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांनी सांगितले. १४ किलोमीटरच्या या परिक्रमेची सुरुवात पहाटे खंडोबा मंदिर परिसरातून झाली. पहाटेपासूनच साईनामाच्या गजराने संपूर्ण शिर्डी परिसर दुमदुमून गेला होता. परिक्रमेच्या मार्गावर ठिकठिकाणी भजन, कीर्तन आणि नामस्मरणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे भाविकांचा उत्साह अधिकच वाढल्याचे चित्र दिसून आले.
अवश्य वाचा: पारनेरच्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक करिअरची दारे उघडी
साईभक्त मोठ्या संख्येने सहभागी
या परिक्रमेतील महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय ठरली. विद्यार्थी, शिक्षक, प्रीती सुधाजी शैक्षणिक संकुलाचे विद्यार्थ्यांनी पावली सादर केली..सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, संत-महंत विविध राज्यांतून आलेले साईभक्त या परिक्रमेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देश-विदेशातून आलेल्या भाविकांच्या उपस्थितीमुळे परिक्रमेचे स्वरूप अधिक व्यापक झाले. लाखो भाविकांची गर्दी असूनही कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी स्वयंसेवक आणि पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. भाविकांच्या सोयीसाठी मार्गावर ठिकठिकाणी पिण्याचे पाणी, फराळ तसेच महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
नक्की वाचा : बुरुडगाव रस्त्यावरील ‘पे अँड पार्क’ योजनेला विरोध; नगरसेविका मीना चोपडा यांचे आयुक्तांकडे निवेदन
यंदा साई परिक्रमा महोत्सवाचे सातवे वर्ष (Dr. Sujay Vikhe Patil)
या परिक्रमेवेळी डॉ. सुजय दादा विखे पाटील यांनी स्वतः साईबाबांचा रथ ओढला. त्यांच्या सहभागामुळे भाविकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. शिर्डीच्या पावन भूमीत साई परिक्रमा महोत्सवाचे सातवे वर्ष यंदा अत्यंत दिमाखात साजरे झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.डॉ विखे म्हणाले की साईबाबांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली, हे आमचे परमभाग्य आहे. साईबाबांचे प्रेम केवळ भारतापुरते मर्यादित नसून ते जगभर पसरले आहे, याची प्रचिती या परिक्रमेतून आली. देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच विदेशातून मोठ्या संख्येने साईभक्त शिर्डीत दाखल झाले,” असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले. भावनिक आणि भक्तीमय वातावरणात पार पडलेल्या या साई परिक्रमे मध्ये एक लाखांहून अधिक भाविकांनी सहभाग नोंदवत साईचरणी नतमस्तक होत श्रद्धेची प्रचिती दिली.


