Ahilyanagar | नगर : भारत (India) निवडणूक आयोगाचा ‘मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२६’ लवकरच सुरू होत आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून, सध्याच्या मतदार यादीतील मतदारांची नावे सन २००२ च्या अंतिम मतदार यादीतील नावांसोबत संलग्न करणे अनिवार्य असल्याची माहिती, अहमदनगर (Ahilyanagar) विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी दिली आहे.
हे वाचा – अतिवृष्टीने बाधित गावांतील नुकसानाची केंद्रीय पथकाकडून पाहणी
बीएलओंना दिल्या सूचना (Ahilyanagar)
अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातील सर्व यादी भाग हे शहरी भागात येत असल्याने, सध्याच्या मतदारांच्या नावांची २००२ च्या यादीशी जुळवणी करण्याची प्रक्रिया काहीशी क्लिष्ट ठरत आहे. त्यामुळे हे काम वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बी.एल.ओ.) सर्व मतदारांशी संपर्क साधून कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.
हे पहा – सीसीटीव्हीमध्ये ‘कॉपी’चा महापूर दिसला अन् 19 जणांची सुट्टी…
मतदार यादीत नावे शोधा (Ahilyanagar)
याबाबत नागरिकांना आवाहन करताना पाटील म्हणाले की, मतदारसंघातील नागरिकांनी बी.एल.ओ. माहितीसाठी घरी आल्यास त्यांना सहकार्य करावे. मतदारांनी त्यांना सन २००२ मधील आपल्या किंवा कुटुंबीयांच्या नावाच्या नोंदीबाबत माहिती द्यावी. विशेषतः विवाहित महिला मतदारांनी, सन २००२ मध्ये त्यांच्या माहेरच्या यादीत (वडील किंवा आईच्या नावासोबत) त्यांचे नाव असल्यास त्याबाबतची माहिती द्यावी. तसेच, ज्या तरुण मतदारांची नावे २००२ च्या यादीत नसतील, त्यांनी त्यावेळच्या यादीत आपल्या आई-वडिलांची किंवा आजोबांची नावे कोठे होती, याची माहिती बी.एल.ओ. यांना उपलब्ध करून द्यावी.



