Guru Tegh Bahadur | अहिल्यानगरमध्ये २२ फेब्रुवारी रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

0
Shri Guru Tegh Bahadur Sahibji
Shri Guru Tegh Bahadur Sahibji : श्री गुरु तेगबहादूर साहिबजी ३५० व्या शहिदी शताब्दी वर्ष

Guru Tegh Bahadur | नगर :  ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी (Guru Tegh Bahadur) यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी वर्षाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. २२) मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे वाचा – पारनेरच्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक करिअरची दारे उघडी

गोविंदपुरा येथे शिबिर (Guru Tegh Bahadur)

​अहिल्यानगरमधील गोविंदपुरा येथील गुरुद्वारा भाई दया सिंहजी या ठिकाणी हे शिबिर पार पडणार आहे. ते सर्व नागरिकांसाठी पूर्णपणे विनामूल्य असणार आहे. समाजातील वाहन चालक, कारखाना कामगार, मजूर , आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांचे आरोग्य सुदृढ राहावे, या मुख्य उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

अवश्य वाचा – पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेलेल्या नितीनची निर्घुण हत्या; दोन गट रुग्णालयातच भिडले

विविध शिबिरांचे आयोजन (Guru Tegh Bahadur)

​या आरोग्य शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाद्वारे ​सर्वसाधारण आरोग्य तपासणी, मोफत रक्त चाचण्या, ​नेत्र व श्रवण तपासणी, ​हृदयरोग, स्त्रीरोग व अस्थिरोग तज्ज्ञांचा विशेष सल्ला या सेवा दिल्या जाणार आहेत. ‘आयुष्यमान भारत’ योजनेसाठी जागेवरच नावनोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हे पहा – विद्यार्थिनीच्या धाडसाला सलाम! स्वतःच्या अपहरणाचा डाव उधळला…

सेवेकऱ्यांचे आवाहन (Guru Tegh Bahadur)

मानवता व धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाची व त्यांच्या कार्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी, शिबिराच्या ठिकाणी त्यांच्या जीवनावर आधारित विशेष लघुपट दाखवण्यात येणार आहे. ​या समाजोपयोगी उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी गरजू नागरिक, तसेच सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा. जास्तीत जास्त लोकांनी या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन गुरुद्वारा भाई दया सिंहजींचे सेवेकरी व जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here