Gram Panchayat : जातेगाव ग्रामपंचायतमध्ये १८ दिव्यांगांना निधी वाटप; समृद्ध ग्राम अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद 

Gram Panchayat : जातेगाव ग्रामपंचायतमध्ये १८ दिव्यांगांना निधी वाटप; समृद्ध ग्राम अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद 

0

Gram Panchayat : पारनेर : जातेगाव येथे ग्रामपंचायतीच्या (Gram Panchayat) वतीने पाच टक्के दिव्यांग निधीतून १८ दिव्यांग लाभार्थ्यांना प्रत्येकी १ हजार रुपयांचे धनादेश (cheque) वाटप करण्यात आले आहे. या उपक्रमातून दिव्यांग (Divyang) बांधवांना आर्थिक मदत मिळाल्याने त्यांना दिलासा मिळाला. यावेळी गावातील दिव्यांग नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. ग्रामपंचायत पदाधिकारी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धनादेश वितरण करण्यात आले.

नक्की वाचा : श्री गुरु तेगबहादूर साहिबजी ३५० व्या शहिदी शताब्दी वर्ष

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष बैठक

याच कार्यक्रमानंतर घरकुल लाभार्थ्यांसाठी सौर ऊर्जा बसवण्याबाबत विशेष बैठक घेण्यात आली. घरांवर सोलर पॅनल बसवून वीज बचत आणि स्वयंपूर्ण ऊर्जेचा वापर कसा साधता येईल, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. अनेक घरकुल लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री सौर योजनेत सहभागी होण्याबाबत उत्सुकता दर्शवली. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सर्व पात्र लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

अवश्य वाचा : टी-२० विश्वचषकात मोठा उलटफेर; दुबळ्या झिम्बाब्वेने दिला ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का

विकासकामांची उल्लेखनीय पूर्तता (Gram Panchayat)

गावात समृद्ध ग्राम अभियानांतर्गत विविध विकासकामांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक महत्त्वाची उद्दिष्टे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहेत. पाच टक्के निधीचे वाटप पूर्ण करण्यात आले. कर व इतर वसुलीचे उद्दिष्ट गाठत ५० टक्के वसुली पूर्ण करण्यात आली आहे. घरकुल योजनेंतर्गत सुरू असलेली सर्व घरे पूर्ण करून घरकुल बांधकामाचे उद्दिष्ट शंभर टक्के साध्य करण्यात आले आहे. तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध कामे पूर्ण करून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. या प्रसंगी मा. सरपंच संजय गायकवाड, विठ्ठल पोटघन, कांताबाई हरगुडे, विलास ढोरमले, ग्रामसेवक राजू विधाटे, कर्मचारी अनिल ढोरमले, विठ्ठल ढोरमले, बाळू ढोरमले आदी उपस्थित होते.