Sharada Sarita Song:नात्यांच्या सूक्ष्म छटांना सूर देणारं ‘तिघी’ चित्रपटातील ‘शारदा सरिता’ गाणं प्रदर्शित

0
Sharada Sarita Song:नात्यांच्या सूक्ष्म छटांना सूर देणारं ‘तिघी’ चित्रपटातील ‘शारदा सरिता’ गाणं प्रदर्शित
Sharada Sarita Song:नात्यांच्या सूक्ष्म छटांना सूर देणारं ‘तिघी’ चित्रपटातील ‘शारदा सरिता’ गाणं प्रदर्शित

नगर: मराठी चित्रपट सृष्टीतील ‘तिघी’ या (Tighee Movie) चित्रपटाने आधीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नात्यांची गुंतागुंत आणि भावनिक प्रवास यांचा सखोल वेध घेणाऱ्या या चित्रपटातील ‘हास जराशी’ हे पहिले गाणे प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले. त्यानंतर आता चित्रपटातील आणखी एक संवेदनशील आणि भावस्पर्शी गाणे ‘शारदा सरिता’ (Sharada Sarita Song) प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर (Bharati Acharekar) यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, आई–मुलीच्या नात्याचा हळुवार आणि भावनिक प्रवास मांडणारे हे गाणे प्रत्येक आईसाठी आणि प्रत्येक मुलीसाठी खास ठरणार आहे.

नक्की वाचा: उन्हाळ्याची चाहूल लागताच पुण्यात पावसाच्या सरी बरसणार;काय सांगतो हवामान विभागाचा अंदाज ? 

शब्द, सूर आणि गायन यांचा सुंदर मेळ साधणारे ‘शारदा सरिता’  (Sharada Sarita Song)

शब्द, सूर आणि गायन यांचा सुंदर मेळ साधणारे ‘शारदा सरिता’ अभिनेता-कवी जितेंद्र जोशी यांनी लिहिलेल्या या गाण्याचे शब्द अत्यंत काव्यमय असून निलेश मोहरीर यांनी दिलेल्या सुरेल आणि मृदू संगीतामुळे गाण्याला शांत, प्रवाही असा भाव लाभला आहे. तसेच प्रियंका बर्वे यांच्या आवाजाने या गाण्याला अधिक भावनिक उंची मिळाली आहे. शब्द, सूर आणि गायन यांचा सुंदर मेळ साधणारे ‘शारदा सरिता’ हे गाणे मनाला स्पर्शून जाते. आईच्या नजरेतून मुलीकडे आणि मुलीच्या मनातून आईकडे पाहाण्याचा कोमल भाव या गीतातून अनुभवायला मिळतो.

अवश्य वाचा: “दादा,आता त्या विठ्ठलाशी आयुष्यभर भांडण कायम राहील”;अमोल मिटकरींचं अजित दादांना व्हॅलेंटाईन निमित्त भावनिक पत्र

दिग्दर्शिका जीजिविषा काळे म्हणतात, ‘तिघी’ हा चित्रपट नात्यांच्या न बोलल्या जाणाऱ्या भावना आणि सूक्ष्म घालमेल टिपणारे आहे. ‘शारदा सरिता’ हे गाणं केवळ कथानकाचा भाग नाही, तर तो एक भावनिक प्रवास आहे. आयुष्यात येणाऱ्या शांत, तरीही खोलवर परिणाम करणाऱ्या क्षणांना हे गाणं स्वर देतं. विशेषतः आई आणि मुलीमधील नात्याची हळवी, मजबूत वीण या गीतातून अधिक अधोरेखित होते. या गाण्यामुळे प्रेक्षक पात्रांच्या मनोविश्वाशी अधिक घट्टपणे जोडले जातील, असा विश्वास आहे.

चित्रपटात कलाकार नेमके कोण ? (Sharada Sarita Song)

चित्रपटात कलाकार नेमके कोण ?‘तिघी’मध्ये भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे बायस यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ हा चित्रपट येत्या ६ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जीजिविषा काळे दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे, नेहा पेंडसे बायस यांनी केली आहे.