Gas tank explosion | श्रीगोंदा: तालुक्यातील कोळगाव येथील वेठेकरवाडी (जुनी वाडी) परिसरात शुक्रवारी (ता.१३) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट (Gas tank explosion) झाला. या भीषण घटनेत घराची भिंत कोसळली असून घरावरील पत्रे हवेत उडाले आहेत. या भीषण अपघातात संजय रतन वेठेकर आणि सिंधूबाई वेठेकर हे पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत.
अवश्य वाचा- अकोले नगरपंचायतने ६५ किलो प्लास्टिक केले जप्त
स्फोटाच्या तीव्रतेमुळे घराची भिंत कोसळली (Gas tank explosion)
मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी साडेसातच्या सुमारास वेठेकर यांच्या घरात स्वयंपाक सुरू असताना अचानक गॅस टाकीचा स्फोट झाला. हा स्फोट इतका जबरदस्त होता की, संपूर्ण परिसर आवाजाने हादरून गेला. स्फोटाच्या तीव्रतेमुळे घराची भिंत कोसळली आणि छताचे पत्रे हवेत फेकले गेले. स्फोटाचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले. गॅस टाकीच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत वेठेकर पती-पत्नी गंभीर जखमी झाले. जखमी दांपत्याला परिसरातील नागरिकांनी उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल केले. जखमींची अवस्था गंभीर असल्याने त्यांना तातडीने अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून, तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.



