Knife Attack | नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरातील कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत आज (ता. १४) पहाटे जुन्या वादातून एका २९ वर्षीय युवकावर चाकू हल्ला (Knife Attack) करून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात संदीप बबन सावंत यांच्यावर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी शुभम श्रीकांत साठे (वय २९, रा. बंगला नं- ०३ अनुज कॉम्प्लेक्स, आनंदनगर, स्टेशन रस्ता, अहिल्यानगर), हे जखमी झाले आहेत.
हे वाचा – डोळ्यांनी अंध असली तरी ‘ती’ देणार डोळस न्याय!थान्या नाथन नेमक्या कोण ?

मारहाणीचे कारण…
फिर्यादीत म्हटले आहे की, संदीप ऊर्फ बबन सावंत याचे व फिर्यादीचे मागील ६ वर्षापूर्वी अर्थिक व्यवहार झालेले होते. आज (ता.१४) रोजी लोखंडी पुलावर बसलेलो असताना माझ्या ओळखीचा संदीप बबन सावंत हा माझ्या जवळ आला व म्हणाला की, “आपल्या दोघांमध्ये झालेल्या आर्थिक व्यवहाराचे पैसे तुझ्याकडे बाकी आहे, ते मला उद्यापर्यंत देवुन टाक” असे म्हणाला.
अवश्य वाचा – होमगार्डला मारहाण; भिंगारमधील दोघांवर गुन्हा दाखल
फिर्याद दाखल
त्यावेळी मी त्याला म्हणालो की, “आपल्या व्यवहाराचे पैसे माझ्याकडे बाकी नाही तुला काय करायचे ते कर” असे म्हणालो असता त्याचा राग आल्याने त्याने शिवीगाळ करु चाकुने वार करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.



