Vaishnavi Hagavne Case:वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात सहा आरोपींवर आरोप निश्चित;खटल्याची सुनावणी कधी?

0
Vaishnavi Hagavne Case:वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात सहा आरोपींवर आरोप निश्चित;खटल्याची सुनावणी कधी?
Vaishnavi Hagavne Case:वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात सहा आरोपींवर आरोप निश्चित;खटल्याची सुनावणी कधी?

नगर: राज्यभर खळबळ उडवणाऱ्या वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात (Vaishnavi Hagavne Case) महत्वाची माहिती समोर आली आहे. या हुंडाबळी प्रकरणात सत्र न्यायालयाने सहा आरोपींविरुद्ध आरोप निश्चित (Charges framed against six accused) केले आहेत. या खटल्याची सुनावणी येत्या २३ फेब्रुवारीपासून सुरू (Hearing from February 23) होणार आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी १४ जुलै रोजी ११ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये राजेंद्र हगवणे, त्यांची पत्नी, दोन मुलं, एक मुलगी आणि इतर सहा जणांचा समावेश होता. वैष्णवीच्या मृत्यूनंतर ५८ दिवसांनी हे आरोपपत्र दाखल झाले होते. आता सत्र न्यायालयाने सहा आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केले आहेत.

नक्की वाचा: डोळ्यांनी अंध असली तरी ‘ती’ देणार डोळस न्याय!थान्या नाथन नेमक्या कोण ?

प्रकरण नेमकं काय ? (Vaishnavi Hagavne Case)

वैष्णवी हगवणे हिचा मृतदेह १६ मे रोजी भुकूम येथील सासरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. सुरुवातीला हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता, मात्र शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. आत्महत्या की खून याबाबत संशय निर्माण झाला होता. हगवणे कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी असल्यानं पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले होते.

तपासाची सूत्र वेगाने फिरली. पोलिसांनी या प्रकरणात वैष्णवीचे पती शशांक हागवणे, सासू लता हागवणे, नणंद करिश्मा हागवणे, सासरे राजेंद्र हागवणे, दीर सुशील हागवणे आणि कुटुंबीय मित्र निलेश चव्हाण यांना अटक केली. हगवणे कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी असल्याने पोलिसांच्या तपासावरही टीका झाली होती. विशेष म्हणजे निलेश चव्हाण याच्यावर वैष्णवीच्या अल्पवयीन मुलाला बेकायदेशीर ताब्यात ठेवून धमकावल्याचा अतिरिक्त आरोपही ठेवण्यात आला आहे.

अवश्य वाचा: नात्यांच्या सूक्ष्म छटांना सूर देणारं ‘तिघी’ चित्रपटातील ‘शारदा सरिता’ गाणं प्रदर्शित 

पुढील सुनावणी २३ फेब्रुवारीपासून (Vaishnavi Hagavne Case)

१७ मे रोजी वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर जुलै महिन्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सविस्तर आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. तपासाचा वेग वाढवत पोलिसांनी या प्रकरणात वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे आणि कुटुंबीय मित्र निलेश चव्हाण यांना अटक केली. या सर्वांवर हुंडाबळी, आत्महत्येस प्रवृत्त करणे, छळ व मारहाण, गुन्हेगारी कट रचणे तसेच पुरावे नष्ट करण्याचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. आता न्यायालयाने आरोप निश्चित केल्याने या बहुचर्चित प्रकरणाच्या सुनावणीला वेग येणार असून या प्रकरणाची सुनावणी २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.