
Anand Mela : पाथर्डी : शालेय विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर व्यवहारीक ज्ञानाचीही ओळख व्हावी, गणिती क्रिया प्रत्यक्ष आयुष्यात कशा वापरायच्या हे शिकता यावे आणि भविष्यात सक्षम, आत्मविश्वासी नागरिक घडावेत या उद्देशाने शहरातील एकलव्य शिक्षण संस्था (Eklavya Education Institute) संचलित पाथर्डीच्या एम. एम. निऱ्हाळी विद्यालय (M. M. Nirhali School) येथे बाल आनंद मेळावा (Anand Mela) व आनंद बाजाराचे आयोजन करणयात आले होते. या मेळाव्यात तब्बल १३० स्टॉल्स उभारण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या खाद्यपदार्थ व वस्तूंची विक्री करून हजारोंची उलाढाल करत शिका आणि कमवा चा प्रत्यक्ष अनुभव घेतला. विद्यालयाच्या परिसरात भरलेल्या या आनंद बाजार ने जणू एखाद्या ग्रामीण जत्रेचे स्वरूप धारण केले होते.
नक्की वाचा : नागरिकांनी युनानी उपचारांचा लाभ घ्यावा : डॉ. सोनाली बांगर

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
रंगीबेरंगी सजावट, विद्यार्थ्यांची शेफ वेशभूषा, आकर्षक पाट्या आणि आमचा पदार्थ चाखा म्हणत ग्राहकांना केलेला आग्रह यामुळे वातावरण उत्साहाने फुलून गेले होते. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध स्टॉल्स लावले. हिरव्या पालभाज्या, भेळ, पाणीपुरी, वडापाव, घरगुती स्नॅक्स, खेळणी, पेरू, चिकू, बोरे, संत्री तसेच विविध सुका मेवा यांची विक्री करण्यात आली. काही विद्यार्थ्यांनी आरोग्यदायी पदार्थांवर भर देत पौष्टिक खाद्यपदार्थ सादर केले होते. या मेळाव्यातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे विद्यार्थ्यांनी स्टॉलची मांडणी, भांडवल उभारणी, खरेदी-विक्री व्यवहार, सुट्टे पैसे देणे-घेणे, नफा-तोटा मोजणे अशा सर्व गणिती व व्यावहारिक बाबी स्वतः हाताळल्या. ग्राहक देवो भव या संकल्पनेनुसार प्रत्येक ग्राहकाचे हसतमुखाने स्वागत करण्यात येत होते. पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. अशा आनंद बाजारातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास नेतृत्वगुण आणि व्यवहारकुशलता विकसित होते.
अवश्य वाचा : महापौर गाडे यांची जुन्या महापालिकेत अचानक पाहणी; स्वच्छतेबाबत व्यक्त केली नाराजी
विद्यार्थ्यांना व्यवहार कळण्यास होणार मदत (Anand Mela)
यातून विद्यार्थ्यांना या जगात कशा पद्धतीने व्यवहार केले जातात, व्यवहाराची चालना कशी मिळते. आशा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना कळण्यास मदत होणार असल्याचा विश्वास माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे यांनी व्यक्त केला. मेळाव्याचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष कांतीलाल गुगळे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या प्रभावती ढाकणे, गटशिक्षणाधिकारी रामनाथ कराड, विश्वस्त श्रीकांत निऱ्हाळी, समन्वयक बाळकृष्ण जोशी, नगरसेवक देवा पवार, नगरसेविका सविता भापकर, सुरेखा हंडाळ, माणिक पालवे, संजय दहिफळे तसेच विद्यालयाचे प्राचार्य संजय घिगे आदी मान्यवर उपस्थित होते. मेळावा यशस्वी करण्यासाठी संतोष लोहाडे, गणेश कुदळ, विठ्ठल वारकड, गिरीश जोर्वेकर, गणेश खेडकर, राजेंद्र राठोड, रामनाथ चौधरी आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक बाळासाहेब घुले,सूत्रसंचालन गणेश सरोदे तर आभार राधाकृष्ण कोठे यांनी मानले.


