नगर : टी २० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan T20 World Cup) या दोन प्रतिस्पर्धी संघांमध्ये होणाऱ्या सामन्याकडं संपूर्ण देशाचं लागलं आहे. भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामना उद्या (ता.१५) श्रीलंकेतील कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. मात्र, हा सामना रद्द होण्याची शक्यता (Chances of the match being cancelled) व्यक्त केली जात आहे.
नक्की वाचा: राज्यात १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना दप्तरही मोफत मिळणार;राज्य शासनाचा निर्णय जाहीर
भारतीय संघानं या स्पर्धेतील दोन सामन्यांमध्ये एकतर्फी विजय मिळवला आहे. पाकिस्तान संघाला नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात निसटता विजय मिळाला होता. त्यासाठी त्यांना झुंजावे लागले होते. तर यूएसएविरुद्धचा सामनाही पाकिस्तानने खिशात घातला होता. आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होत आहे. या सामन्यातील विजयी संघ सुपर ८ मध्ये क्वालिफाय होणार आहे. या सामन्याबाबत क्रिकेट विश्वात प्रचंड उत्सुकता आहे. मात्र, हा सामना रद्द होण्याची शक्यता आहे. कारण श्रीलंकेच्या हवामान विभागानं १५ फेब्रुवारीला कोलंबोतील हवामानविषयक अंदाज व्यक्त केला आहे. हा अंदाज व्यक्त करताना हवामान विभागानं पावसाचा इशारा दिला आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा टॉस संध्याकाळी ६.३० वाजता (भारतीय वेळेनुसार) होईल, सामना अर्ध्या तासाने संध्याकाळी ७ वाजता (भारतीय वेळेनुसार) सुरू होईल.
अवश्य वाचा: वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात सहा आरोपींवर आरोप निश्चित;खटल्याची सुनावणी कधी?
भारत -पाकिस्तान सामन्यादरम्यान पावसाचा अलर्ट (India Vs Pakistan T20 World Cup)
श्रीलंकेच्या हवामान विभागानं वेदर बुलेटिन प्रसारित केलं आहे. १५ फेब्रुवारीला या विभागाने पावसाचा अलर्ट दिला आहे. बंगालच्या दक्षिण-पूर्व खाडीत एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची दाट शक्यता आहे. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरल्यास हा सामना रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सामन्याआधी पाऊस थांबणार ? (India Vs Pakistan T20 World Cup)
श्रीलंकेच्या कोलंबोत १५ फेब्रुवारीला आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना होत आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरू होईल. अॅक्युवेदरच्या रिपोर्टनुसार, त्यावेळेला पावसाची शक्यता केवळ ९ टक्के असेल. दुसरीकडं संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पावसाची शक्यता ४९ टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळं नाणेफेकीला उशीर होऊ शकतो. त्यानंतरही ढगांची गर्दी असेल, पण पावसाचं सावट कमी होण्याची शक्यता आहे.
टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.



