Various characteristics | अकोले: येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व भास्करराव कदम गुरुजी प्रि-प्रायमरी स्कूलचा विविध गुणदर्शन (Various characteristics) कार्यक्रम नुकताच मोठ्या दिमाखात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, गीत, नाटिका, देशभक्तीपर सादरीकरणे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे उपस्थितांची मने जिंकली. या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार डॉ. किरण लहामटे यांची उपस्थिती लाभली.
अवश्य वाचा- ‘राहुल गांधींची खासदारकी रद्द करा’; भाजप खासदाराची लोकसभेत मागणी
विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुणगौरव (Various characteristics)
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधीज्ञ वसंत मनकर होते. नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, सोनाली नाईकवाडी, अक्षय आभाळे, कविराज भांगरे, वैष्णवी धुमाळ, शीतल वैद्य, सागर चौधरी, गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत, केंद्रप्रमुख भांगरे, विनय सावंत, प्रकाश टाकळकर, पोलीस उपनिरीक्षक हजारे व अमोल वैद्य उपस्थित होते.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुणगौरव करण्यात आला. चिमुकल्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाचे आमदार लहामटे यांनी विशेष कौतुक केले व शाळेच्या प्रगतीसाठी सातत्याने सहकार्य करण्याचे आश्वासन देत लवकरच शाळेसाठी सुमारे ६० लाख रुपयांची सुसज्ज अभ्यासिका उभारून देण्यात येईल, अशी घोषणा केली. या घोषणेने पालक व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.



