Stayed overnight | संगमनेर: संगमनेर खुर्द येथील वैदूवाडी परिसरात राहणाऱ्या सुरज सूर्यभान शिंदे (वय ३६) या युवकाला संशयास्पदरित्या झालेल्या गंभीर जखमांमुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. गुरुवारी (ता. १२) रात्री खांडगाव फाटा परिसरात सुरज चालवत असलेल्या इलेक्ट्रिक मोपेडची एका व्यक्तीस धडक बसून ती व्यक्ती जखमी झाल्याची घटना रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास घडली होती. या घटनेनंतर संबंधित व्यक्तीने व इतरांनी केलेल्या बेदम मारहाणीत सुरज गंभीर जखमी (seriously injured) झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. घटनेनंतर तब्बल ४८ तास उलटूनही या प्रकरणाची तीव्रता कमी झालेली नाही. शुक्रवारी (ता.१३) सायंकाळी नाशिक येथे शवविच्छेदन झाल्यानंतर सुरजचा मृतदेह संगमनेरात आणण्यात आला. त्यानंतर कुटुंबीयांसह शेकडो समाजबांधवांनी शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन (Stayed overnight) केले.
अवश्य वाचा- ‘राहुल गांधींची खासदारकी रद्द करा’; भाजप खासदाराची लोकसभेत मागणी
गुन्हा दाखल करण्यात न आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी (Stayed overnight)
धडक लागून जखमी झालेल्या व्यक्तीच्या जबाबातील विसंगती, मारहाणीचे प्राथमिक पुरावे व घटनास्थळाची छायाचित्रे सादर करूनही पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल करण्यात न आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. महिला व लहान मुलांसह आंदोलकांनी रात्रभर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या देत, गुन्हा दाखल झाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नसल्याची ठाम भूमिका घेतली. दरम्यान, शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी भूमिका पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी घेतल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. सुदैवाने दोन्ही बाजूंनी संयम राखल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

नक्की वाचा- डोळ्यांनी अंध असली तरी ‘ती’ देणार डोळस न्याय!थान्या नाथन नेमक्या कोण ?
रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा (Stayed overnight)
या घटनेची माहिती मिळताच नाशिक, अकोले, पारनेर, श्रीरामपूर, कोपरगाव आदी भागांतून समाजातील कार्यकर्ते संगमनेरात दाखल झाले. न्याय न मिळाल्यास “पुणे–नाशिक महामार्गवर , छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांसमोर मृतदेह ठेवून रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. अखेर आज दुपारी श्रीरामपूर विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी संगमनेरात येऊन समाजबांधवांशी चर्चा केली. त्यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास आंदोलक मृतदेहासह घरी रवाना झाले.



