IND vs PAK : नगर : पाकिस्तान संघाविराेधात भारतीय संघाचा (IND vs PAK) ओपनर इशान किशन (Ishan Kishan) याने केलेल्या तोडफोड खेळीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 (ICC T20I World Cup 2026) स्पर्धेत पाकिस्तानचा धुव्वा उडवत विजय मिळवला आहे. 27 व्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानसमोर 176 धावांचं आव्हान ठेवलं होतं.

नक्की वाचा : सुरज शिंदे मृत्यू प्रकरणी संगमनेरात तणाव; गुन्हा दाखल करण्यासाठी समाजबांधवांचा रात्रभर ठिय्या
टीम इंडियाची टी 20I वर्ल्ड कप इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या
टीम इंडियाची टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील 175 ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. टीम इंडियाने यासह स्वत:चाच रेकॉर्ड ब्रेक केला. टीम इंडियाने याआधी 2022 साली पाकिस्तान विरुद्ध 6 विकेट्स गमावून 160 धावा केल्या होत्या. पाकिस्तानला मोहम्मद नवाजच्या रुपाने सहावा धक्का बसला तेव्हाच पाकिस्तानच्या हातून सामना गेल्याचं समोर आलं

अवश्य वाचा: पाकिस्तानचा पुन्हा खिम्मा, T20 मध्ये भारताने पाकिस्तानला 61 धावांनी पाजलं पाणी
ईशान किशनचे विक्रमी अर्धशतक (IND vs PAK)
इशानने त्याच्या स्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सामन्यापूर्वी अभिषेक शर्माची चर्चा होत असताना आणि तो पाकिस्तानसाठी सर्वात मोठा धोका मानला जात असताना, सामन्यादरम्यान कथा उलट झाली. अभिषेक पहिल्या षटकात धाव न घेता बाद झाला, परंतु ईशानने धमाकेदार खेळी केली. फिरकीपटू सॅम अयुबचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न करताना तो बोल्ड झाला. पण तो पॅव्हेलियनमध्ये परतण्यापूर्वीच त्याने आपले काम केले. जरी त्याने शतक झळकावले नसले तरी, इशानने अवघ्या 40 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांसह 70 धावा केल्या.
टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानवर ६१ धावांनी धुव्वा उडवत सुपर8 मध्ये एन्ट्री मारली आहे. भारताचा पाकिस्तानवर वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा विजय ठरलाय. भारतीय संघाला फलंदाजीसाठी पाकिस्तानने निमंत्रण दिले होते. पहिल्यांदा बॅटींग करताना भारतीय संघाने 20 ओव्हरमध्ये 175-7 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला 114 वर ऑल आऊट केलं. भारताकडून हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि वरूण चक्रवर्ती यांनी दोन विकेट घेतल्या. या पराभवानंतर पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. पॉइंट टेबलमध्ये भारत अग्रस्थानी असून सुपर8 मध्ये स्थान मिळवलं आहे. तर पाकिस्तान संघ तिसऱ्या स्थानी फेकला गेला आहे.



