Murder : नगर: अहिल्यानगर तालुक्यातील निंबळक (Nimblak) शिवारातील साईबन समोरील मोकळ्या पटांगणात एका ७५ वर्षीय वृध्दाचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात वार करून खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बापू नामदेव शिंदे (रा. मनोरमा कॉलनी, साईनाथनगर, अरूण हॉटेल मागे, नवनागापूर, अहिल्यानगर) असे खून झालेल्या वृध्दाचे नाव आहे.
नक्की वाचा : सुरज शिंदे मृत्यू प्रकरणी संगमनेरात तणाव; गुन्हा दाखल करण्यासाठी समाजबांधवांचा रात्रभर ठिय्या
साईबन समोरील मोकळ्या पटांगणात घडली घटना
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहन बापु शिंदे (वय ४०, रा.मनोरमा कॉलनी, साईनाथनगर, अरूण हॉटेल मागे, नवनागापूर, अहिल्यानगर) यांनी रविवारी (ता.१५) पहाटे फिर्याद दिली आहे. सदरची घटना शुक्रवारी (ता.१३) दुपारी दोन ते शनिवारी (ता.१४) रात्री १०:४१ वाजताच्या दरम्यान घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बापू नामदेव शिंदे यांचा शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून ते शनिवारी रात्री १०.४१ वाजेच्या दरम्यान खून करण्यात आला आहे. ही घटना साईबन समोरील मोकळ्या पटांगणात, विळद बायपासजवळ, निंबळक गावच्या शिवारात घडली. अज्ञात आरोपीने
अवश्य वाचा: पाकिस्तानचा पुन्हा खिम्मा, T20 मध्ये भारताने पाकिस्तानला 61 धावांनी पाजलं पाणी
डोक्यात वार करून त्यांना गंभीर जखमी केल्याने मृत्यू (Murder)
कोणत्यातरी कठीण साधनाने बापु शिंदे यांच्या डोक्यात वार करून त्यांना गंभीर जखमी केले असून त्यातूनच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन तसेच स्थानिकांकडून चौकशी सुरू करण्यात आली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.



