Rekha Kakad : ऱाहूरी : महाशिवरात्र हा फक्त सण नसून आत्मचिंतन, भक्ती आणि साधनेचा दिवस आहे. भगवान शंकर साधेपणा, त्याग आणि करुणेचे प्रतीक आहेत, असे प्रतिपादन रेखाताई महाराज काकड (Rekha Kakad) यांनी केले. राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोडवरील शिंदे वस्ती येथील ओंकारेश्वर मित्र मंडळाच्या वतीने महाशिवरात्री (Mahashivratri) उत्सवानिमित्त आयोजित किर्तन सेवेत त्या बोलत होत्या. पुढे बोलताना रेखाताई काकड म्हणाल्या की, महाशिवरात्रीच्या दिवशी जागरण आणि उपवास केले जातात मात्र केवळ शरीराचा उपवास न करता मनातील वाईट विचारांचा उपवास करणे अधिक महत्त्वाचे आहे. राग, मत्सर आणि द्वेष सोडून प्रेम, दया व क्षमा यांचा स्वीकार केल्यास शिवतत्त्व आपल्या जीवनात उतरते.
नक्की वाचा: इंडियन क्रिकेट टीमशी भिडलात तर …, अनिल कपूर आणि हरभजन सिंहने कुणाला दिला इशारा
यावेळी उपस्थिती
यावेळी नगराध्यक्ष सत्यजित कदम, मढी देवस्थानचे विश्वस्त तान्हाजीराव धसाळ, साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, उपनगराध्यक्षा बेबी बर्डे, माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे, माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम, आदर्श नागरी पतसंस्थेचे चेअरमन प्रा. सुधाकर कदम, नगरसेवक तथा गटनेते प्रकाश संसारे, अमोल कदम, अजित चव्हाण, वसंत कदम, ऋषभ लोढा, बाळासाहेब लोखंडे, भारत शेटे, वैभव गाडे, साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन संगीता कपाळे, नगरसेविका सुजाता कदम, प्रेरणा पतसंस्थेचे चेअरमन सुजित वाबळे, माजी नगरसेवक संजय बर्डे, तनपुरे कारखान्याचे माजी संचालक मच्छिंद्र तांबे, आदर्श नागरीचे व्हा. चेअरमन आबासाहेब वाळुंज, डॉ.विलास पाटील, साई सेवा पतसंस्थेचे प्रदीप येवले, राहुरी निधी संस्थेचे चेअरमन रामभाऊ काळे, अजय खिलारी, देवळाली सोसायटीचे चेअरमन मंजाबापू वरखडे, शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दिपक त्रिभुवन, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर मनोज शिंदे, माजी नगरसेविका उर्मिला शेटे, प्रकाश सोनी आदी उपस्थित होते.
अवश्य वाचा: पाकिस्तानचा पुन्हा खिम्मा, T20 मध्ये भारताने पाकिस्तानला 61 धावांनी पाजलं पाणी
सकाळपासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी (Rekha Kakad)
प्रकाश नवले गुरू यांच्या अधिपत्याखाली महारुद्राभिषेक झाला. ओंकारेश्वर मंदिरात सकाळपासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. यावेळी अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या डेप्युटी मॅनेजरपदी निवड झाल्याबद्दल संजय वर्पे यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ओंकारेश्वर मित्र मंडळाचे पदाधिकारी, ओंकारेश्वर महिला मंचच्या सदस्यांनी व परिसरातील भाविकांनी अथक परिश्रम घेतले.



