
Ajit Pawar : नगर : अजित पवार यांचे विमान अपघातात निधन (Ajit Pawar Death in Baramati Plane Crash) झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला होता. दरम्यान अजित पवारांच्या (Ajit Pawar) निधनाच्या दिवशीच एक लाजिरवाणी घटना मंत्रालयात घडली. सरकारकडून शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला. त्याचवेळी अजित पवार यांच्याकडे असलेल्या अल्पसंख्याक विभागात (Minority Department) धक्कादायक प्रकार घडला. अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशीच मंत्रालयात (Ministry) अल्पसंख्याक विभागात सह्यांचा सपाटा सुरु होता. या विभागाकडून ७५ शिक्षण संस्थांना घाईघाईत अल्पसंख्यांक दर्जा देण्यात आला.
नक्की वाचा : सुरज शिंदे मृत्यू प्रकरणी संगमनेरात तणाव; गुन्हा दाखल करण्यासाठी समाजबांधवांचा रात्रभर ठिय्या
या गंभीर प्रकरणाची फडणवीस यांनी घेतली दखल
अजितदादांनी थांबवून ठेवलेल्या काही फाइल्सवर निधनाच्या दिवशीच दुपारी ४ वाजता सह्या करण्यात आल्या आणि ७५ शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जाचं प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं. या घटनेची माहिती समोर येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. तसंच या प्रमाणपत्रांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.
अवश्य वाचा: पाकिस्तानचा पुन्हा खिम्मा, T20 मध्ये भारताने पाकिस्तानला 61 धावांनी पाजलं पाणी
अधिकाऱ्यांचा संवेदन शून्य कारभार (Ajit Pawar)
ऑगस्ट २०२५ पासून या शाळांना अल्पसंख्यांक दर्जाची प्रमाणपत्रं देण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. पण अजित पवार यांचं अपघाती निधन होताच अल्पसंख्यांक विभागातील अधिकाऱ्यांनी स्थगिती डालवून अल्पसंख्यांक प्रमाणपत्रांचं वाटप केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. २८ जानेवारीच्या सकाळी पावणे नऊच्या सुमारास अजित पवारांचं निधन झालं. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास अल्पसंख्यांक विभागाकडून शाळांना प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं. मंत्रालयातील कारभारावर व अधिकाऱ्यांवर वचक ठेवणारे अजित पवार यांच्या निदानाच्याच दिवशी हा प्रकार झाल्याने अधिकाऱ्यांना धाक उरला नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सर्व नियम पायदळी तुडवून, संवेदनशीलता गुंडाळून ७५ शाळांना प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर राज्यभर चर्चेचा विषय ठरले. सर्व स्तरातून टीका होऊ लागली. त्यामुळे या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाला स्थगिती दिली आहे. तसेच उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात दोषींच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर गुपचूपपणे प्रमाणपत्रांची खिरापत वाटणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.


